Home > Uncategorized > ‘आता तर शाई पण निघून गेली’ अभिनेत्री जुई गडकरीचा टोला

‘आता तर शाई पण निघून गेली’ अभिनेत्री जुई गडकरीचा टोला

‘आता तर शाई पण निघून गेली’ अभिनेत्री जुई गडकरीचा टोला
X

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहेत. तरी देखील अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही. यावर मराठी अभिनेत्री जुई गडकरीने टोला लगावला आहे. शिवाय तिच्या सोबतीला कमेंटबॉक्स मध्ये नेटीझन्सही आपल्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत.

“आता तर शाई पण निघून गेली,” असा टोला लगावत अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या बोटाचा शाई पुसट झालेला फोटो फेसबुक वर पोस्ट केला आहे.

“एका बाजूला बोंबलायचं की, मतदान करा आणि प्रामाणिकपणे मतदान केलं तर हे लोक चेष्टा करतायत.” अशी संतप्त प्रतिक्रीया जुईने व्यक्त केली आहे.

Updated : 9 Nov 2019 11:40 AM GMT
Next Story
Share it
Top