Home > Uncategorized > ‘या’ उमेदवाराने दिली प्रणिती शिंदेंना धमकी

‘या’ उमेदवाराने दिली प्रणिती शिंदेंना धमकी

‘या’ उमेदवाराने दिली प्रणिती शिंदेंना धमकी
X

सोलापूर मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उतरलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांनी प्रचारादरम्यान बोलताना प्रणिती शिंदे यांना "तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही" अशी धमकी दिली आहे.

नरसय्या आडम यांचा एका सभेदरम्यान बोलताना तोल सुटला आणि त्यांनी प्रणिती शिंदे यांना थेट धमकीच दिली. "तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद ठेवतो तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो," असं आडम भाषणादरम्यान म्हणाले.

तसचं पुढे बोलताना आडम म्हणाले की,”माझ्यावर १७० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि हा आकडा २०० झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. शिवाय चोरी, डाका, फसवणूक या केसेस नाहीत. तर, परवानगी नसताना सभा घेणं, धरणे आंदोलन, रास्ता रोको असे गुन्हे आहेत. हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत.” असं देखील आडम यांनी म्हंटलं आहे. आडम यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद आता चांगलाच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 9 Oct 2019 12:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top