Home > Uncategorized > सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांच्या लेकीनं केली पूर्ण

सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांच्या लेकीनं केली पूर्ण

सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांच्या लेकीनं केली पूर्ण
X

दिवंगत सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. याबाबत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी याबाबत भावनिक ट्वीट केले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयत कुलभूषण जाधव खटल्याच्या सुनावणी दरम्यान हरिष साळवी यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केलं होतं. यासाठी त्यांनी केवळ एक रूपया मानधन ठरवलं होतं. कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी साळवे यांना त्यांचे मानधन घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र, या दरम्यान सुषमा स्वराज यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. परंतू सुषमा स्वराज यांच्या मुलीने हरिष साळवे यांची भेट घेऊन, त्यांना ठरलेले मानधन दिले आहे.

याबाबत ट्वीट करताना स्वराज कौशल यांनी म्हटलं की, “आज बांसुरीने, कुलभूषण जाधव खटल्याची एक रूपया फी, हरिष साळवे यांना देऊन, तूझी अंतिम इच्छा पूर्ण केली.”

Updated : 28 Sep 2019 4:17 PM GMT
Next Story
Share it
Top