Home > Uncategorized > जैसा फिल्मोंमें होता है, हो रहा है रूबरू!

जैसा फिल्मोंमें होता है, हो रहा है रूबरू!

जैसा फिल्मोंमें होता है, हो रहा है रूबरू!
X

हिंदी फिल्म्सचा चांगलाही परिणाम होतो. 'थ्री इडियट्स' ने, 'बेटा काबिल बन, कामियाबी अपने आप कदम चूमेगी', ह्या बाबतीत डोळे उघडले, तसं अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं. पॅनगॉन्ग लेक! त्यानंतर ह्या भागातलं tourism वाढलं असं इथले लोक सांगतात. हाच तो पॅनगॉन्ग लेक! पिवळ्या स्कूटरवरुन हेल्मेट आणि चष्मा घालून आलेली करीना कपूर आणि मागे निळंशार पाणी बघून सिनेमागोअर्स आणि hardcore travellers च्याही काळजाचं पाणी झालं. समुद्रसपाटीपासून १४००० फूट उंचीवर असलेलं जगातलं एकमेव खाऱ्या पाण्याचं तळं. ४०% भारतात आणि ६०% चायनामध्ये. आपण आपल्या वाट्याचे ४०% बघू शकलो तरी अक्षरश: धन्य होतो. पांडव खूप अवघड प्रवास करून स्वर्गाच्या दारापर्यंत गेले तसा feel आला मला इथे. स्वर्ग आहे हा. हा असा निळा रंग फक्त रंगपेटीत बघतो आपण. ह्या रंगाचं पाणी असतं हे आपण विसरलो आहोत. पलिकडे बर्फाची शिखरं असतातच. ह्या लेकच्या काठावर करीनाच काय आपणही सगळे सुंदर दिसू.

टनुब्रा व्हॅलीतून निघून आम्ही इथे आलो ह्याला साधारण ८ तास आणि २०० किमी लागले. अप्रतीम सुंदर रस्ता.. बराचसा. मध्ये मध्ये काही पावनखिंडी होत्या पण एव्हाना शौर्य वाढलं होतं त्यामुळे त्या पार करता आल्या. एव्हाना अजून एक गोष्ट घडली होती. हिरी मला कुठल्या रंगाचा टीशर्ट घालू एवढाच प्रश्न विचारायची बाकी होती! हिराही जरा वरमला होता. आपल्याकडे बायकांचं ड्रायव्हिंग हा सनातन काळापासूनचा विनोदाचा विषय आहेच. त्यात बाईक. आणि ग्रुपमध्ये असलो की नाही म्हटलं तरी थोडं एकमेकांसाठी adjust करावं लागतं, थांबावं लागतं. पहिल्या दिवशी त्याच्या चेहर्यावर ' आता ह्या बाईचं लोढणं पुढचा एक आठवडा आपल्याला सहन करावं लागणार' असे भाव होते. 'मी काहीतरी कमाल करणारे' असा माझाही दावा नव्हताच. पण पुढचे काही दिवस मी बरी बाईक चालवल्यामुळे त्याच्या चेहर्यावर किंचित आदर दिसू लागला. एखादा खूप चॅलेंजिंग रस्ता क्रॉस केला की तो माझ्याकडे बघून thums up ची खूण करू लागला! त्या दिवशीचा आमच्यातला संवाद काहीसा असा-

मी: (अंगभूत आगाऊपणा) पॅनगॉन्गके लिये वापस बहोत उपर जाना है. आप दवाई खालो।

हिरी: हम 'रम' पीए तो चलेगा?

मी: (बुचकळ्यात) अभी? क्यूँ?

हिरी: उससे अंदरसे थोडा गरम लगेगा नं?

मी: (मंजिरी आणि पूजा frustrate होऊन निघून जाताना बघत ) कैसा है, alcohol से blood pressure बढता है और dehydration होता है. हमको exactly उलटा करना है. bp बढने नहीं देना है और dehydrate नहीं होना है.

हिरी: ( थंडपणे) फिर रातको पीए?

मी: (मनात) आंघोळ करा, मला काय?

कमाल वाटली मला. आपण ज्या भागात जाणारोत त्याची थोडीही माहिती नं घेता कसे येतात लोक?

पॅनगॉन्गलाही आम्ही tent मध्येच राहिलो. भयाण वारं. आणि ०-१ डिग्री temperature. रोज रात्री मात्र आम्हाला दाल रोटी एक सब्जी आणि गरम सूप मिळायचं. गरम अशी ती एकच गोष्ट असायची. आंघोळीसाठी पूर्ण आठ दिवसांत आम्हाला एकदाच कडकडीत पाणी मिळालं. मुळात ह्या भागात गीझर्स नसतात आणि रात्री अकरा वाजता कंपल्सरी लाईट्स बंद करतात. बॉर्डरजवळ असल्यामुळे. इथून खरं तर चाळीस किमीवर चायना बॉर्डर आहे. असं तिथला माणूस म्हणाला. पण आपल्या पब्लिकसाठी शूटिंग लोकेशन दिसलं की हद्द संपते त्यामुळे तिथून पुढे ते नेत नाहीत तर..

१. हे टेन्ट्स सिंथेटिक कापडाचे असतात. ह्यांनी थंडी,वारं ह्यापासून बचाव होतो पण दुसरं असंही होतं की सगळीच हवा कट होते. मुळात oxygen कमीच. tents च्या आत भयानक suffocate होतं. त्यारात्री मंजिरीला खूप त्रास झाला. मिट्ट काळोख आणि श्वास घ्यायला त्रास ह्याने घाबरायला होतं. त्यामुळे torch, power bank, ह्या गोष्टी बरोबर ठेवाच.

२. एव्हाना थकवा जाणवायला लागलेला असतो. अंग दुखायला लागलेलं असतं. ग्लुकॉन डी किंवा तत्सम काहीतरीची गरज वाटू शकेल. आमचा ८०% प्रवास संपला होता. शेवटचा चांगला पासचा प्रवास हा ह्या ट्रिपमधला सर्वात चॅलेंजिंग दिवस असणार आहे असं आमचा trio organiser पहिल्या दिवसापासून सांगत होता. मला टेन्शन येत होतं. अजून चॅलेंजिंग? म्हणजे? ठीक आहे. उद्या बघूया हा चांगला पास काय आहे तो..

मुग्धा गोडबोले रानडे

Updated : 24 July 2019 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top