पहिल्या महिला डीजीपी कांचन भटाचार्य यांचे निधन...
Max Woman | 28 Aug 2019 6:59 PM IST
X
X
आपल्या उत्तम कामगिरीने देशाचं नाव मोठं करून अनेक स्त्रियांना प्रेरणा देणाऱ्या क्वचितच महिला असतात. अशाच काही महीलांमध्ये कांचन चौधरी भटाचार्य यांचा देखील समावेश होता. देशातील दुसरी आयपीएस ऑफिसर आणि पहिल्या डीजीपी महीला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कांचन चौधरी भटाचार्य यांचे सोमवारी निधन झाले. कंचन चौधरी या खूप दिवसांपासून आजारी होत्या आणि जवळच्या खाजगी रुग्नालयात त्यांच्यावर उपचार सूरू होते. हिमाचल प्रदेशातील रहीवाशी असणाऱ्या आणि 1973 च्या बॅचमधील महिला आईपीएस ऑफिसर कांचन चौधरी यांनी 2004 साली उत्तराखंडच्या पोलीस महासंचालक होऊन इतिहास रचला या पदापर्यंत पोहचणाऱ्या भटाचार्य या देशातील पहिल्या महिला होत्या. 2007 मध्ये कांचन भटाचार्य पोलीस महासंचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्या आणि तेव्हापासून त्या मुंबई मध्ये राहत होत्या. सेवानिवृत्ती नंतर 2014 मध्ये यांनी उत्तराखंडमधील हरिव्दार लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या तिकीटावर निवडणुक देखील लढवली होती परंतु त्यांना या निवडणुकी मध्ये यश मिळाले नाही.
एका काळी दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘उडान’ हा कांचन चौधरी भटाचार्य यांच्या जीवनावर आधारीत होता. या कार्यक्रमाची निर्मीती त्यांची बहीण कविता चौधरी यांनी केली होती. तसेच 2004 मध्ये मेक्सिको येथे झालेल्या इंटरपोल बैठकीत कांचन भटाचार्य यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्यात आले होते. तसेच 1997 मध्ये त्यांना विशीष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पदकही प्रदान केले होते.
Updated : 28 Aug 2019 6:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire