Home > Uncategorized > "मानलेलं असलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं भाऊ-बहिणीच अनमोल नातं"

"मानलेलं असलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं भाऊ-बहिणीच अनमोल नातं"

मानलेलं असलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं भाऊ-बहिणीच अनमोल नातं
X

भाऊबिजेला धनंजय मुंडेंच्या फेसबुक पेजवर एक फोटो झळकला आणि पूर्ण महाराष्ट्र त्याकडे भावपूर्ण नजरेने पाहू लागल. तो फोटो होता सुप्रियाताई सुळे आणि धनंजय मुंडे यांचा... आणि कँप्शन मध्ये लिहिलेलं, "मानलेलं असलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं भाऊ बहिणीच नातं."

यातून राजकारणामुळे धनंजय मुंडेंच्या ह्रदयाला झालेली इजा लक्षात येते. जे प्रेम त्यांना रक्ताच्या नात्यापासून मिळालं नाही, जे बहिणीचं प्रेम राजकारणाच्या खेळात हिरावून घेतलं तेच प्रेम राजकारणाने त्यांना पुन्हा दिलं.

निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर चिखलफेक होत असतो परंतु या निवडणुकीपासून याची पातळी खूपच खालावली. परळी मतदारसंघातून मुंडे भाऊ-बहीण एकमेकांच्या विरोधात उभे होते. यावेळेस प्रचारादरम्यान भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की उभा महाराष्ट्र त्याकडे डोळे फाडून पाहत होता.

धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे पंकजा मुंडे या प्रचंड व्यथित झाल्या. एवढेच नव्हे यामुळे प्रचारादरम्यान त्यांना भोवळ आली आणि त्या स्टेजवर कोसळल्या अशी चर्चा रंगली.

त्यानंतरच्या एका सभेत ही माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्देवी निवडणूक असून माझ्यावरील आरोपांनी मी व्यथित झाले आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

आमच्या कुटुंबात धनंजय मुंडेमुळेच वाद झाले आहेत, असं सांगतानाच त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या विधानामुळे मला त्यांचा तिरस्कार वाटतो, असं पंकजा म्हणाल्या. धनंजय मुंडे यांच्या खोटेपणाचा प्रचंड कंटाळा आलाय. माझे पतीही या विधानामुळे व्यथित झाले आहेत. माझ्या आयुष्यातील ही सर्वात वाईट निवडणूक असून कालपासून मी व्यथित झाले आहे. सध्या राज्यात विकृत राजकारण पाह्यला मिळतंय. मलाच जर इतका त्रास होत असेल तर इतरांचे काय? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केले हे सिद्ध केल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन, असे म्हणत आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा उलट आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता.

राखी बांधणाऱ्या बहिणीबाबत मी कधीही खालच्या थराला येऊन असले विधान करणार नाही, मात्र नव्याने दाखल झालेले भाऊ मला खलनायक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून माझे समाजातील अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुंडे यांनी सांगितल होतं.

धनंयज मुंडे यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांतर राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांना नोटीस धाडली होती. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप एडिट करून तयार करण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. आणि ही व्हिडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये नेऊन तपासावी अशी मागणीही त्यांनी केली.

पंकजा मुंडेंचं राजकारणातून बाहेर जाणं बीडला परवडणारं नाही – प्रितम मुंडे

आरोप सिद्ध झाल्यास मी माझं जीवन संपवीन - धनंजय मुंडे

राजकारण एवढ्या थरापर्यंत जातं याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला झालं आणि याचं उत्तर म्हणून परळीच्या जनतेने निवाडा केला असंच म्हणावं लागेल. त्यानंतर रक्ताच्या भावा बहिणीत नक्कीच असलेलं अंतर आणखी वाढलं.

पण या दिवाळीत भाऊबीजेला धनंजय मुंडे यांना जनतेतून ते प्रेम मिळालं. त्यांनी मानलेल्या १५०० बहिणींनी त्यांना भाऊबीजेची ओवाळणी दिली. सोबतच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाऊबीजेला ओवाळत बहिणीचं प्रेम दिलं. बहीण-भावाचं नातं किती निर्मळ असत हे धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यातून पुन्हा उभ्या महाराष्ट्राने पाहिलं.

खालच्या पातळीचे राजकारण पंकजा ताई करु नका – रुपाली चाकणकर

- अक्षय ओहोळ

Updated : 30 Oct 2019 8:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top