Home > Uncategorized > गूगल बदलतंय लॉगिन करण्याची पध्दत, जाणून घ्या आवश्यक डिटेल्स!

गूगल बदलतंय लॉगिन करण्याची पध्दत, जाणून घ्या आवश्यक डिटेल्स!

गूगल बदलतंय लॉगिन करण्याची पध्दत, जाणून घ्या आवश्यक डिटेल्स!
X

Google ने मे महिन्यामध्ये यावर्षीच्या शेवटापर्यंत Two Factor Authentication सगळ्यांसाठी अनिवार्य करणार असल्याची घोषणा केली होती. आता कंपनी ने या निर्णयाच्या अंमलबजावणीची तारीख देखील घोषित केली आहे. two-step verification लागू झाल्यानंतर जेव्हा केव्हा यूजर गूगल अकाउंट लॉगिन करतील तेव्हा त्यांना OTP चा एक SMS किंवा E-mail प्राप्त होईल. ही प्रक्रिया आपल्या व्यक्तिगत देशाच्या सुरक्षेसाठी तयार केली गेली आहे. पासवर्ड चोरी ही आता खूप सामान्य बाब झालीये त्यामुळे अनेकांच्या गुगल अकाउंटवरून डेटाची चोरी केली जाते. Two Factor Authentication या डेटा चोरीपासून आपल्या गुगल अकाऊंटचं संरक्षण करेल.

9 नोव्हेंबरला होणार अंमलबजावणी

Google टू-स्टेप व्हेरिफिकेशन (two-step verification) इनेबल करण्यासाठी ईमेल आणि ऍपद्वारे मेसेज पाठवत आहे. ९ नोव्हेंबरपासून आपोआप ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. Google ने मेसेजमध्ये लिहिलं आहे की, "पासवर्ड टाकल्यानंतर, आपल्याला फोनवर दुसरा टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. लॉगीन करतेवेळी आपला फोन सांभाळून ठेवा. टू-स्टेप व्हेरिफिकेशन ९ नोव्हेंबरपासून आपोआप ऍक्टीव्ह होणार आहे. आपल्याला हवं असल्यास आपण त्याआधीच ही प्रक्रिया लागू करू शकता."

काय म्हणालं होतं गुगल?

एका ब्लॉग मध्ये यापूर्वी गुगल म्हणालं होतं, "2021च्या वर्षाअखेर, आम्ही 2SV मध्ये अतिरिक्त 150 मिलियन Google वापरकर्त्यांना ऑटो-नामांकित करण्याची योजना बनवत आहोत. तसेच याला सुरू करण्यासाठी 2 मिलियन YouTube क्रिएटर्सची आवश्यकता आहे.''

अनिवार्य असणार नाही

अजुनही 2SV ला सगळ्यांसाठी अनिवार्य केलं गेलं नाहीये. Google वापरकर्त्यांना बॅच दर बॅच या प्रोग्राममध्ये समाविष्ट करणार आहे. जर आपल्याकडे टू-स्टेप व्हेरीफिकेशन आपल्या Google खात्यासाठी डिसेबल आहे, तर आपण मॅन्युयली इनॅबल करू शकता.

Updated : 5 Nov 2021 9:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top