तीर्थक्षेत्रातच कोमेजल्या कळ्या
X
तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द असलेला उत्तरकाशी जिल्हा सध्या एका वेगळयाच कारणासाठी चर्चेत आला आहे.नुकत्याच झालेल्या एका निरीक्षणात उत्तरकाशी जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये गेल्या ३ महिन्यात फक्त १ मुलगी जन्माला आल्याची नोंद आहे. या जिल्ह्यातील दुंडा, भटवरी, नौगाव, मोरी, चिन्यालासूर या गावांमधून २१६ मुले जन्माला आली तर मुलगी होण्याचे प्रमाण जवळजवळ नगण्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रीभृण हत्या झाल्याने सारा जिल्हा हादरून गेला आहे.
या माहीतीमुळे इथले प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने सर्व पातळ्यांवर चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.स्थानिक ‘आशा’ सेविकाबरोबरच आरोग्य विभागाकडूनही या विषयीची माहीती प्रशासन घेत आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.’ मुलगी वाचवा’ हे धोरण मोठ्या राबवण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.