Home > Uncategorized > पहिलं चांद्रयान मोहीम.. प्रतिभाताई आणि मी... -विलास आठवले

पहिलं चांद्रयान मोहीम.. प्रतिभाताई आणि मी... -विलास आठवले

पहिलं चांद्रयान मोहीम.. प्रतिभाताई आणि मी... -विलास आठवले
X

दहा वर्षापूर्वाचा दिवस अजूनही जसाच्या तसा मनात आहे. तो मरेपर्यंत पुसला जाणार नाही हे सत्य आहे. भारताने च्रांद्रयानाची मोहीमे साठी आखला होता. देशभर त्याची चर्चा होती. माध्यमात काम करत असल्यांने आमच्याही बेठका झाल्य़ा. संपादक राजीव सरांनी सर्वांना समजून सांगितलं. बातमी मिस नाही झाली पाहिजे अशा सप्ष्ट सूचना दिल्या. सर्वजण कामाला लागले ग्राफीक्स तयार , स्क्रीप्ट तयार आता घोषणा झाली की बातमी उतवायची अशी तयारी झाली. संध्याकाळ झाली. सर्वजण कामात होते आणि इतक्यात राजीव सर केबिन मधून बाहेर आले आणि मोठ्याने बरसले अरे झोपा काढताय का ते बघा बातमी उतरली दुसरीकडे असं म्हणत स्वाताहा रनडाऊनला बसून टाईप करू लागले. आम्ही सगळे चिडीचूप कारण काही सेंकद आधी दुस-या चॅनलने बातमी उतरवली होती आणि बिग टेक्स सुरू झाले होते.

ऑफीसमधील वातावरण तंग कारण तयारी केली होती पण बातमी वेळेवर चालली नाही. राजीवसरांच्या बातमी टाईप करता करता चेह-यावर रागही दिसत होता. मी त्यांच्या मागे उभा होतो कारण माझात माझे नवे दिवस होते साधी टाईपिंगही येत नव्हती. आणि मनात अपराधी भावनाही की आपण एव्हढी वर्ष पत्रकारितेत काम केलेय आपल्या नजरेतून वेळ कशी चुकली याची. दहा पंधरा मिनिटे झाली. सर टाईप करत होते आणि माझ्या मनात एक सुरू होतं हे भरून कसं काढायचं कारण दुस-या चॅनलला क्रेडीड गेलं. विचार सुरू होता इतक्यात राजीव सर उठले आणि त्यांना पुढे होऊन म्हटलं सर आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोनो घेवू या का ? सरांनी असं माझ्याकडे पाहिलं आणि निघून गेले. विचार करता करता मी काय विचार केला तर देशाच्या पंतप्रधानांचा फोनो घ्यायचा कुणीही वेड्यात काढलं असतं .

माझा रिजनल चॅनल त्यात पंतप्रधान कधी फोनो देत नाहीत. सर केबिनमध्ये गेले थोडा विचार केला. आणि मी माझ्या खिशातली डायरी काढली . देवीसिंग शेखावत यांचा नंबर काढला आणि त्यांना फोन केला. आपण कुठे आहात हे विचारलं आणि सांगितलं मला ताईंचा फोनो घ्यायचाय. देशाच्या इतिहासात आपण पहिल्यांदाच चंद्रावर पोहचणार आहोत. त्यांनी ऐकून घेतलं. मी अमरावतीला आहे मी निरोप देतो म्हणाले. अर्धातास झाला. मी परत त्यांना फोन केला सर दिला का निरोप पुन्हा विचारलं. त्यांनी सांगितलं त्या लाईनवर नाहीत पुन्हा करतो. पंधरा मिनिटांनी त्यांचा फोन आला आणि त्यांनी राष्ट्रपती भवनाचा फोन नंबर दिला आणि यांच्याशी बोला म्हणून सांगितलं. मी फोन केला ज्यांचं नाव सांगितलं होतं त्यांना बोललो. ते म्हणाले मॅडम को मेसेज देते है. त्यांनी माझ्या कडून आफीसचा नंबर लिहून घेतला. पुन्हा अर्धा एक तास गेला मी दुस-या कामात होतो तरीही माझं लक्ष तिकडेच. आता फोन येईल नंतर येईल असं मनालाच समजाऊन सांगत होतो. जागे वरून उठलो पुन्हा राष्ट्रपती भवनाला फोन केला बोललो. निरोप दिला आहे , पुन्हा . निरोप देतो म्हणाले. असाईमेंटला नंबर देऊन ठेवले होते म्हणाले जरा लक्ष ठेवा पाठपुराव करा.

उज्जवल खेळकर यालाही म्हटलं होतं तु जरा विदर्भाचा आहेस देविसिंग यांच्याशी बोल.. उज्जवलही बोलला. अर्धा एक तास गेला.. तास दोन तास च्रांद्रयानाच्या बातमीवरच सर्व न्युज चॅनल होते. आणि अचानक राष्ट्रपति भवनातून फोन आला.. महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील बात करेंगे ... एकच धावपळ उडाली फोनो प्लेट तयार करण्यापासून सर्व कामाला लागले.. अंकर मिलिंद भागवत होता.. फोन कनेक्ट झाला .. देशासाठी एक गौरवशाली क्षण आहे आपली शक्ति कुणाही पेक्षा कमी नाही हे आपण सिद्ध केले अशा प्रतिक्रिया ताईंनी दिली आणि तीही मराठीत .. एका खाजगी वाहिनीला.. देशात हे यापूर्वी कधीही झाले नव्हते आणि देशात पुन्हा कधीही होणार नाही.. संपला.. एका सेंकदात दिल्ली आफीस मधून साजी यांची फोन आला तुरंत फोनो कट कर के भेजिए.. प्रोमो बनाईए... मिलिंदचं बुलेटीन संपलं तो खुर्चीवरून खाली उतरला आणि थेट माझ्याकडे आला आणि त्यांने घट्ट मिठ्टी मारली तब्बल दहा पंधरा सेंकद..विलास क्या बात है ... आज दिवाळी आहे दिवाळी ...संपूर्ण आफीस काही सेंकद हवेत होतं..एक वेगळा आनंद.. एक वेगळी नशा..माझाचं संपूर्ण आफीस या घटनेनं भारावून गेलं होतं.. नंतर ब-याच जणांनी विचारलं हे तुला सुचलं कसं.. तेव्हा मी सांगतो हे सर्व संपादकांचं श्रेय बातमी मिस झाली तर नुसतं ओरडणं ठीक असतं पण स्वताहून येऊन टाईप करणं, काम करणं ही प्रेरणा असते कल्पना सुचायला.. आणि त्यात दुस-याचॅनलने बातमी उतरवली असेल तर आपण त्यांच्या पेक्षा आणखी काय वेगळं करायचा विचार केल्यावर मलाही सुचलं की या घटनेवर कोण बोलायला नकार देईल.. भारताची ही अत्यंत ऐतिहासिक घटना आणि त्या आनंदात प्रत्येकाला सहभागी व्हायला आवडेल आणि मला पहिलं नाव सुचलं मनमोहन सिंग यांचं पण ते हिंदी असल्यामुळे दुसरं नाव सुचलं प्रतिभाताई पाटील यांचं... त्या मराठी भाषिक होत्या त्या नकार देणार नाही आणि त्यांनाही आपल्या देशवासियांशी बोलायला आवडेल या विश्वासाने.. आज आपण दुस-यांदा चांद्रयान मोहीम युशस्वीरित्या पार पाडलीय..सप्टेंबरमध्ये आपण चंद्रावर पोहचू..या पेक्षा अधिक आंनंद काय असू शकतो...

विलास आठवले -पत्रकार

Updated : 23 July 2019 12:47 PM GMT
Next Story
Share it
Top