Home > Uncategorized > प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल...

प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल...

प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल...
X

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा प्रियंका गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी आर्थिक मंदीवरून मोदी सरकारवर ट्विटर च्या माध्यमातून निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी , “अर्थव्यवस्था मंदीमुळे ढासळत चालली आहे. भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार लटकत आहे. तसंच ऑटो सेक्टर आणि ट्रक सेक्टरमधील उत्पादन-ट्रान्सपोर्टेशनमध्ये घट झाली आहे. यामुळे बाजारपेठेचा विश्वास तुटत चालला आहे. एवढ सगळं होत असताना सरकार डोळे कधी उघडणार?”, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थिती वरुन तिखट शब्दात मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दोन दिवसापुर्वी देखील प्रियंका गांधी यांनी “अर्थव्यवस्थेची वाट लावून सरकार मौन धरून बसलं आहे. कंपन्या संकटात आल्या असून, व्यापारही ठप्प झाला आहे. कधी नाटक करून, छळ करून, तर कधी खोटं बोलून सरकार प्रचार करत आहे. असं करून सरकार देशाची अवस्था बिकट झाली असल्याचे लपवत आहे”, अशाप्रकारे शाब्दिक हल्ला प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी पक्षावर केला आहे

Updated : 10 Sep 2019 2:49 PM GMT
Next Story
Share it
Top