Home > Uncategorized > अशी पूर्ण केली तिनं आपल्या वडीलांची शेवटची इच्छा

अशी पूर्ण केली तिनं आपल्या वडीलांची शेवटची इच्छा

अशी पूर्ण केली तिनं आपल्या वडीलांची शेवटची इच्छा
X

श्रुती गणेश गावडे या चिंचवड मधील मुलीने आपल्या दिवंगत वडीलांच्या इच्छापूर्तीसाठी चक्क अमिताभ बच्चन यांच्या चित्रांचे मोफत प्रदर्शन आयोजित आहे.

श्रुतीचे वडील हे अमिताभ बच्चनचे फार मोठे फॅन होते आणि त्यांचे चित्र साकारावे अशी त्यांची फार इच्छा होती. 4 महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. पण अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंशुल क्रिएशनच्या माध्यमातून तब्बल ७७ चित्रांचे प्रदर्शन घडवून तिने तिच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे.

अक्षरमुद्रणातून चितारलेल्या या चित्रांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे आहेत. हे प्रदर्शन 11 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर, सकाळी 11 ते रात्री 9 ह्या वेळेत रामकृष्ण मोरे कलादालन, चिंचवड येथे विनामूल्य सुरु असणार आहे.

Updated : 14 Oct 2019 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top