सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पटकावला ‘रिनिंग मिसेस इंडिया’ पुरस्कार
Max Woman | 24 July 2019 6:50 PM IST
X
X
पोलीसांविषयी समाजात एक विशिष्ट प्रतिमा आहे. साहित्य, कलेविषयी पोलिसांना फारशी जाण नसते, असा अनेकांचा समज असतो. पण हा समज चुकीचा ठरवणारे अनेकजण पोलीस दलात कार्यरत आहेत. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी नुकतीच सौंदर्य स्पर्धेत छाप पाडली. सौंदर्य, बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ‘रिनिंग मिसेस इंडिया’ हा किताब पटकावलाय.
बाणेर येथील एका तारांकित हॉटेलममध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील या विजेत्या ठरल्या आहेत. सौंदर्य स्पर्धेत केवळ चांगले दिसणे हा निकष पाहिला जात नाही. त्यासाठी अवांतर वाचनही करावे लागते. पोलीस दलात असल्यामुळे मला समाजातील इतर घडामोडींची माहिती होते. किंबहुना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे मानसिक बळ पोलीस सेवेमुळे मिळाले आणि त्याचा या स्पर्धेदरम्यान फायदा झाला, असं प्रेमा यांनी सांगितलं.
पोलीस कवायत मैदानावरील कवायतीचा सराव असला तरी सौंदर्यस्पर्धेतील रॅम्प वॉकचा अनुभव नव्हता. त्यामुळं विवाहित महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांचे सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून स्पर्धेची तयारी केल्याचं पाटील यांनी सांगितलं.
प्रेमा पाटील यांचा परिचय
प्रेमा या मूळच्या कराडच्या आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनीवाणिज्य शाखेची पदवी मिळवली. 2007 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. त्यानंतर 2009 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. त्यांचे पती संगणक अभियंता असून त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे.
Updated : 24 July 2019 6:50 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire