Home > Uncategorized > लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भगवाच फडकेल आ.डॉ.नीलम गोऱ्हे

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भगवाच फडकेल आ.डॉ.नीलम गोऱ्हे

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भगवाच फडकेल आ.डॉ.नीलम गोऱ्हे
X

महिलांना समाजात सुरक्षा मिळावी यासाठी शिवसेनेने अनेक योजना व उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे शिवसेना विश्वासाला पात्र ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत जसा भगवा फडकला तसा विधानसभेतही फडकेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला.

सिन्नर नगरपरिषदेच्या पुढकारातून व आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून सुमारे 90 लाख रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर वारकरी भवनाच्या रेणुका सभागृहाचे लोकार्पण विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, तेजस्विनी वाजे, उदय सांगळे, तहसीलदार राहुल कोताडे, नगरसेवक प्रतिभा नरोटे, दीपक खुळे, नामकर्ण आवारे, भैय्या बाहेती यांच्यासह मान्यवर उपस्ति होते.

शिवसेनेने माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेवर विश्वास टाकून विधानपरिषदेचे उपसभापतीपद दिले. त्यामुळे शिवसेनेत महिलांना मानाचे स्थान असल्याचे त्या म्हणाल्या. 55 वर्षात महिलेला प्रमच संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात लोक नुसत्या घोषणा करतात मात्र त्यांचा विकास दुर्बीणीतून शोधावा लागतो. मात्र आमदार वाजे यांचा वारकरी भवन उभारण्याचा संकल्प चांगला आहे. त्यातून त्यांचा विकास व सर्वसामान्यांविषयी तळमळ दिसत असल्याचे त्या म्हणाल्या.

पूर्वी सभेला येणार्या महिला अंधारात बसत होत्या. आता त्यांच्या पेहराव, शिक्षणात बदल झाला आहे. महिलांनी आत्महत्त्या करुन आपले आयुष्य संपवून घेऊ नये. उलट एकमेकींना आधार देऊन मदत करावी असे आवाहन गोर्ह यांनी केले. निराश न होता चांगले जीवन जगण्याचा संकल्प करण्याची शपथ त्यांनी महिलांना दिली. कष्टकरी महिला आपल्याला सिनेतारकांपेक्षा सुंदर दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांना अंधश्रध्दा बाजूला ठेवून आपला व कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले.

कुटुंब व्यवस्थेत चांगले बदल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना त्याचबरोबर महिला सुरक्षीत राहाव्यात यासाठी विविध योजना सुरु केल्याचे सांगितले. संधी मिळाल्यावर सिन्नरसाठी आपण आणखी निधी देणार असल्याचे ना.गोर्हे म्हणाल्या.

उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी नीलम गोर्हेे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा उल्लेख केला. आमदार राजाभाऊ वाजे यांनी उपसभापती नीलम गोर्हे यांनी वारकरी भवन बांधण्यासाठी 10 लाखाच्या निधीचा श्रीगणेश केल्याने काम पूर्ण झाल्याचे सांगितले. निधी देतांना त्या आमदार होत्या आता नामदार झाल्याचे वाजे म्हणाले. निधी दिल्याबद्दल वाजे यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी आभार मानले.

Updated : 22 July 2019 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top