Home > Uncategorized > शूटिंगच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना - मुख्यमंत्री

शूटिंगच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना - मुख्यमंत्री

शूटिंगच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना - मुख्यमंत्री
X

ठाण्यातील घोडबंदर परिसरातील चित्रीकरणादरम्यान वेब सीरिजच्या कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी आज अभिनेत्री माही गिल आणि वेब सीरिज क्रू मेंबर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधानभवनात गेले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच या प्रकरणाची दखल विधानपरिषदेमध्ये देखील घेतली गेली. मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देताना या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून ३ जणांचा शोध पोलिस घेत आहे. तसेच सिनेमा, वेबसीरिज यांच्या शूटिंगसाठी मिळणारी परवानगीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणणार आहोत. येत्या १५ ऑगस्टला परवानगी साठी एक खिडकी योजनेचं डिजीटल व्यासपीठ सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाहा हा व्हिडीओ

Updated : 21 Jun 2019 10:47 AM IST
Next Story
Share it
Top