Home > Tech > WhatsApp वर पाठवलेला msg एडिट करता येणार..?

WhatsApp वर पाठवलेला msg एडिट करता येणार..?

WhatsApp वर पाठवलेला msg एडिट करता येणार..?
X

व्हॉट्सअॅप यूजर्सना लवकरच मेसेज एडिटिंग फीचर मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने आता एखाद्याला मेसेज पाठवल्यानंतर यूजर्स टेक्स्टमध्ये झालेली चूक लवकर आणि सहज सुधारू शकणार आहेत. सध्या या फीचरवर काम सुरु आहे. व्हॉट्सअॅप एडिट फीचर कधी आणले जाईल याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती आलेली नाही.

व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमधील सर्व घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने आपल्या अहवालात सांगितले आहे की, सध्या हे फीचर iOS (iPhone ऑपरेटिंग सिस्टम) वापरकर्त्यांसाठी सादर केले जात आहे, जे नंतर Android वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध केले जाईल. .

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, युजरला मेसेज एडिट करण्यासाठी फक्त 15 मिनिटे मिळतील. मेसेज एडिट केल्यानंतर त्यावर 'एडिटेड मेसेज'चा टॅग जोडला जाईल. यामुळे ज्याला MSG केला आत्या तो एडिट केला आहे समजेल..

काय फायदा होईल..?

व्हॉट्सअॅपवरील ग्रुप किंवा वैयक्तिक मेसेजमध्ये अनेकदा आपण चुका करतो. नवीन फीचर वापरकर्त्याला चूक सुधारण्याची संधी देईल. याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप मेसेज वेळेत एडिट करू शकाल.

विंडोज यूजर्ससाठी नवीन व्हॉट्स अॅप लाँच करण्यात आले आहे..

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच विंडोज वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे. या नवीन अॅपद्वारे, डेस्कटॉप वापरकर्ते एकाच वेळी 8 लोकांपर्यंत व्हिडिओ कॉल आणि जास्तीत जास्त 32 लोकांसह ऑडिओ कॉल करू शकतात.

व्हॉट्सअॅपने दावा केला आहे की नवीन विंडोज डेस्कटॉप अॅप जलद लोड होते, जे व्हॉट्सअॅप आणि विंडोज वापरकर्त्यांसाठी परिचित इंटरफेससह लॉन्च केले गेले आहे. यासह, अॅपने मेसेजिंग, मीडिया आणि कॉलसाठी नवीन वैशिष्ट्ये सुधारली आहेत, ज्यात व्हॉट्सअॅपने कालांतराने आणखी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतात 48 कोटींहून अधिक व्हॉट्सअॅप वापरकर्ते आहेत..

भारतात WhatsApp चे सुमारे ४८९ दशलक्ष वापरकर्ते आहेत. त्याच वेळी, त्याचे जगभरात 2 अब्ज पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. 2009 मध्ये Whatsapp लाँच करण्यात आले. 2014 मध्ये फेसबुकने 19 अब्ज डॉलर्समध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले.

Updated : 29 March 2023 2:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top