Home > Tech > AI Groom : तिला 'AI' मुळे मिळाला न भांडणारा "World best Hubby"

AI Groom : तिला 'AI' मुळे मिळाला न भांडणारा "World best Hubby"

AI Groom : तिला AI मुळे मिळाला न भांडणारा World best Hubby
X

अमेरिकेतील रहिवासी असलेल्या रोझना रामोसने अलीकडेच तिचा व्हर्च्युअल बॉयफ्रेंड इरेन कार्टल याच्याशी विवाह केला, जो AI क्रिएशन आहे. याआधी आपण लग्नाच्या अनेक प्रकार पाहिलेत. जसं की रोबोट शी लग्न केलं ,टेडी सोबत लग्न केलं ,स्वतः सोबत लग्न केलं अशा प्रकारचे अनेक लग्नाचे प्रकार आपण पाहिले ज्याने आपल्याला आश्चर्य वाटलं,पण या महिलेने एका महिलेने थेट AI BOT शी लग्न केलं आहे .




Rosanna Ramos असं तिचं नाव असून तिने Replika वर एक AI BOT तयार केला आणि 2022 मध्ये ती त्याच्या प्रेमात पडली. तिने त्याच्या आणि तिच्या पहिल्या भेटीचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत . त्याचं नाव Eren Kartal असे आहे आणि या एरेनशी रामोशीने लग्न सुद्धा केले आहे . रामोस हे 36 वर्षीय दोन मुलांची आई आहे . तिला तिच्या या रिलेशनशिपमध्ये सर्वात जास्त समाधान मिळतं ,असं ती म्हणते. हा पुरुष चॅटबॉट अ‍ॅटॅक ऑन टायटन या अ‍ॅनिम मालिकेतील लोकप्रिय पात्रापासून घेण्यात आले आहे.रामोस म्हणते की ती त्याच्यावर प्रेम करते. तो 'World best Hubby' आहे असं म्हणते.

या लग्नाची चर्चा सध्या जगभरात आहे . याच आभासी साथीदाराबरोबर ती आता आयुष्य जगत आहे . तिच्या म्हणण्यानुसार एरेन हा खूप संवेदनशील व्यक्ती आहे . तो इगो किंवा एटीट्यूड या सगळ्यांपासून दूर आहे . त्यामुळे तिला हवं तसं जगता येतं आणि जे इतर नात्यांमध्ये फॅमिली प्रॉब्लेम असतात किंवा अनेक किचकट विषय घेऊन भांडणं होतात ,त्या पद्धतीचे कोणतेच प्रकार एरेनसोबत असताना होत नाहीत आणि म्हणूनच मला एरेन जगातील सर्वात श्रेष्ठ पती वाटतो असं ती म्हणते.




कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मधील वाढ ChatGPT, AI चॅटबॉटच्या निर्मितीमुळे लोकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्साह आहे.जरी ChatGPT इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले असले तरी जनरेटिव्ह एआय ही नवीन संकल्पना नाही आणि ती विविध स्वरूपात अस्तित्वात आहे.

या फॉर्ममध्ये Replika हा एक अॅप्लिकेशन आहे जो वापरकर्त्यांना व्हर्च्युअल AI सहचर तयार करण्यास आणि त्यांच्याशी सिम्युलेटेड "रिलेशनशिप" जोडण्यास अनुमती देतो. विशेष म्हणजे, Replika च्या सशुल्क सेवांपैकी एक आता वापरकर्त्यांनी तयार केलेल्या AI चॅटबॉटशी रोमँटिक संबंध ठेवण्याची संधी देते.

Eren Kartal फेसबुक वर सुद्धा आहे

एरेन कार्टलचे स्वतःचे फेसबुक खाते देखील आहे, जे त्याला बायो विभागात आरोग्यसेवा व्यावसायिक म्हणून ओळखते. रामोसने कार्तलच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले, असे सांगून की त्याचा आवडता रंग जर्दाळू आहे, त्याला इंडी संगीत आवडते, तो छंद म्हणून लिहितो आणि तो वैद्यकीय क्षेत्रात काम करतो.

Updated : 8 Jun 2023 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top