Home > Tech > Jio वापरत असाल तर हे प्लॅन माहित आहेत का?

Jio वापरत असाल तर हे प्लॅन माहित आहेत का?

Jio वापरत असाल तर हे प्लॅन माहित आहेत का?
X

जगातील सर्वात श्रीमंत व्यवसाईक असलेले मुकेश अंबानी यांचे जगभरात वेगवेगळे व्यवसाय आहेत. याच मुकेश अंबानी यांनी JIO च्या माध्यमातूनन भारतात काय-काय बदल घडवून आणले आहेत हे आम्ही सांगायला नको. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एक वेगेळीच गती दिली आहे. याच jio च्या माध्यमातून ते आपल्या वापरकर्त्यांना अनेक योजना ऑफर करतं असतात, ज्यामध्ये तुमचा मोबाइल महिनाभर 160 रुपयांपेक्षा कमी दरात चालेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सोबतच इतर अनेक फायदे मिळतील. आम्ही तुम्हाला अशाच ४ भन्नाट प्लॅन बाबत सांगत आहोत त्यामुळे पुढील ३ मिनिटे व्हिडिओ नक्की बघा..

91 रुपयांची योजना..

जिओच्या या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एमबी डेटा मिळेल. त्याच वेळी, 200MB अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे, जो वापरकर्ता 28 दिवसांच्या आत कधीही करू शकतो. म्हणजेच युजरला एकूण 3 जीबी डेटा मिळेल. यामध्ये ५० एसएमएस सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या इतर जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

155 रुपयांची योजना..

हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये, अमर्यादित कॉलिंगसह एकूण 2 GB डेटा उपलब्ध आहे. 2 GB हायस्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होऊन 64 Kbps होईल. यामध्ये मेसेजिंगसाठी 300 एसएमएस उपलब्ध असतील. यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या इतर जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

395 रुपयांची योजना..

Jio च्या 395 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह एकूण 6 जीबी डेटा उपलब्ध आहे. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये मेसेजिंगसाठी 1000 एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या इतर जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

1559 रुपयांची योजना..

जिओच्या या प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह 24 जीबी डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. यात 3600 एसएमएसची सुविधाही आहे. यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या इतर जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Updated : 6 April 2023 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top