Home > Tech > Apple महिलांच्या हाती सोपवणार धुरा.. | Apple BKC

Apple महिलांच्या हाती सोपवणार धुरा.. | Apple BKC

Apple महिलांच्या हाती सोपवणार धुरा.. | Apple BKC
X

टेक कंपनी Apple चे पहिले अधिकृत स्टोअर भारतात उघडले आहे. सीईओ टिम कुक यांनी काल 18 एप्रिल रोजी मुंबईत कंपनीच्या पहिल्या फ्लॅगशिप रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. त्यांनी दुकानाचा दरवाजा उघडला आणि लोकांसोबत फोटो काढण्यासाठी पोझही दिली... नक्की हे apple store काय आहे? भारतात असलेले बाकीचे apple store चा apple कंपनीशी काही संबंध नाही का? नक्की ही भानगड काय आहे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये हे स्टोअर बनवण्यात आले आहे. अॅपलची आता 25 देशांमध्ये एकूण 551 स्टोअर्स आहेत. 20 एप्रिल रोजी दिल्लीच्या साकेतमध्ये आणखी एक अॅपल स्टोअर उघडले जाणार आहे त्यानंतर त्याची संख्या 552 होईल.

इथे अनेकांना प्रश्न पडला आहे की, अॅपलचे अनेक स्टोअर्स भारतात आधीच आहेत, यात नवीन काय? वास्तविक, सध्या अॅपलची उत्पादने विकणारी सर्व दुकाने कंपनीचे प्रीमियम रिसेलर आहेत. म्हणजे काय तर एखादे अप्पलचे प्रॉडक्ट विकताना aaple ची परवांनगी घ्यावी लागते. व अशी परवानगी घेऊन हे store चालत आहेत.

ऍपलच्या ऑफिशियल और थर्ड पार्टी स्टोर्स स्टोअरमधील सर्वात मोठा फरक म्हणजे ग्राहकांचा अनुभव. अधिकृत रिटेल स्टोअर्स त्यांच्या प्रीमियम ग्राहक अनुभवासाठी जगभरात ओळखले जातात. याशिवाय या स्टोअर्समध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. स्टोअरमध्ये 50% महिला कर्मचारी आहेत आणि स्टोअरचे नेतृत्व देखील महिला करतात.

Updated : 19 April 2023 7:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top