Home > Tech > Russia Ukraine युद्धाचा वाहन उद्योगावर परिणाम..

Russia Ukraine युद्धाचा वाहन उद्योगावर परिणाम..

Russia Ukraine युद्धाचा वाहन उद्योगावर परिणाम..
X

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युरोपीय आणि जागतिक बाजारपेठेवर याचे परिणाम होताना दिसत आहे. वाहने बनवणाऱ्या कंपन्यांना यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ऑटो सेक्टरच्या पुरवठा साखळी, उत्पादन आणि कार्यशक्तीवरही होईल. वाहन निर्माता फोक्सवॅगन, रेनॉल्ट आणि टायर निर्माता नोकिया टायर्ससह अनेक कंपन्या रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादन थांबवण्याचा आणि त्यांचे प्लांट स्थलांतरित करण्याचा विचार करत आहेत. Hyundai आणि Kia कंपन्या येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात त्यांची देखील या युद्धामुळे डोकेदुखी वाढली आहे.

रशिया पॅलेडियम धातूचा सर्वात मोठा पुरवठादार

रशियामध्ये पॅलेडियम धातू मोठ्या प्रमाणात आढळतो. रशिया पॅलेडियम धातूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साइड या विषारी वायूंचा प्रभाव कमी करण्यासाठी पॅलेडियमचा वापर केला जातो. यासोबतच पेट्रोल आणि हायब्रीड वाहनांमध्ये, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक उपकरणे, दातांचा उपचार त्याच सोबत दागिन्यांमध्येही याचा वापर होतो. या युद्धामुळे त्याची पुरवठा साखळी थांबेल आणि किंमतही वाढेल, ज्याचा परिणाम भारतातील वाहनांच्या किमतीवर होऊ शकतो.

फोक्सवॅगन आणि स्कोडा सारख्या कंपन्यांनी शिपमेंट पुढे ढकलली

युद्ध सुरू झाल्यापासून, रशियन कंपन्यांनी अनेक जागतिक वाहन उत्पादक आणि स्थानिक डीलर्सकडून त्यांची शिपमेंट पुढे ढकलली आहे. पोर्श आणि टाटा ग्रुप लँड रोव्हरनेही त्यांची शिपमेंट पुढे ढकलण्यास सुरुवात केली आहे.

Updated : 1 March 2022 6:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top