Home > Tech > Realme 9 5G या नवीन फोनची मार्केटमध्ये जोरदार चर्चा..

Realme 9 5G या नवीन फोनची मार्केटमध्ये जोरदार चर्चा..

Realme 9 5G या नवीन फोनची मार्केटमध्ये जोरदार चर्चा..
X

Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोन भारतात लॉन्च झाले आहेत. 48 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेऱ्यांनी सुसज्ज असा हा मोबाईल आहे. 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह ह मोबाईल उपलब्ध आहे. Realme 9 5G MediaTek च्या Dimensity 810 5G प्रोसेसर सुद्धा यामध्ये असणार आहे, तर Realme 9 5G SE स्नॅपड्रॅगन 778G 5G प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे.

Realme 9 5G, Realme 9 5G ची किंमत रु. 14 हजार 999 पासून सुरू होणार आहे

भारतात Realme 9 5G ची किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलसाठी ₹14,999 पासून सुरू होते. त्याच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17 हजार 499 रुपये आहे. कंपनी ICICI बँक आणि SBI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 1 हजार 500 रुपयांची त्वरित सूट देत आहे. हा स्मार्टफोन Meteor Black आणि Stargaze White कलर पर्यायांमध्ये येईल. हा सेल Flipkart, realme.com आणि रिटेल स्टोअर्सवर १४ मार्चपासून सुरू होईल.

Realme 9 5G SE ची किंमत 19 हजार 999 रुपयांपासून सुरू होत आहे

Realme 9 5G SE च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. त्याच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22 हजार 999 रुपये आहे. कंपनी ICICI बँक आणि SBI बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 2 हजार रुपयांची झटपट सूट देत आहे. हा फोन Azure Glow आणि Starry Glow कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल आणि 14 मार्चपासून Flipkart, realme.com आणि रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध होईल.

Updated : 11 March 2022 4:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top