Home > Tech > OnePlus स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करणार..

OnePlus स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करणार..

OnePlus स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करणार..
X

OnePlus येणाऱ्या 4 एप्रिलला OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन भारतातील एक स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून लॉन्च करेल.

OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन Adreno 619 GPU, 8GB RAM आणि Snapdragon 695 5G प्रोसेसरसह येईल, ज्यात 8GB वाढवता येणारी रॅम देखील मिळेल. यासोबतच 5000mAh ची बॅटरी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाईल. OnePlus ने दावा केला आहे की 30 मिनिटे चार्ज केल्यावर एक दिवसाचा बॅटरी बॅकअप मिळेल.

स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल

फोटोग्राफीसाठी, मागील पॅनलमध्ये 3× लॉसलेस झूमसह 108MP मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच यात 2MP मॅक्रो लेन्स कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर कॅमेरा दिला जाऊ शकतो. मात्र, मुख्य कॅमेरा व्यतिरिक्त कंपनीने अजून 2 इतर कॅमेरे आणि सेल्फी कॅमेरा, किती मेगापिक्सलचा असेल याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन स्मार्टफोन 21,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करू शकते.

Updated : 1 April 2023 4:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top