Home > Tech > Jio ची ग्राहकांना नवीन भुरळ

Jio ची ग्राहकांना नवीन भुरळ

Jio ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता तीन महिण्यासाठीच्या प्लॅनसोबत Disney + Hotstar सबस्क्रीप्शन फ्री मिळणार..

Jio ची ग्राहकांना नवीन भुरळ
X

Jio ने अनेक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत, जे आता तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शनसह येतील. आत्तापर्यंत, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल फायदे ऑफर करणार्‍या सर्व विद्यमान प्रीपेड प्लॅन्स एक वर्षासाठी रिचार्ज केल्यानंतरच मिळतं होते. आणि हे एक वर्षाचे प्लॅन महाग देखील होते. परंतु आता, कंपनीने चार नवीन योजना लाँच केल्या आहेत ज्यात डिस्ने व हॉटस्टार हे तीन महिन्यांच्या प्लॅनवर देखील असेल.

Jio ने लाँच केलेले चार नवीन प्रीपेड प्लॅन रु. 151, रु 333, रु 583 आणि रु 783 असे आहेत. चला तर मग जाणून घेऊया या चार प्लॅनबद्दल.

रिलायन्स जिओचा १५१ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

151 रुपयांचा प्लॅन केवळ डेटा प्लॅन आहे जो वापरकर्त्यांना 8GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना सक्रिय बेस प्लॅन देखील आवश्यक आहे. यासोबत युजर्सना डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शनही मिळेल.

रिलायन्स जिओचा ३३३ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या 333 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि 100 SMS दररोज अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळेल. डिस्ने + हॉटस्टार मोबाइलच्या तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह प्लॅनमध्ये जिओ अॅप्स उपलब्ध असतील. या प्लॅनमध्ये नवीन ग्राहकांना प्राइम सबस्क्रिप्शन मोफत दिले जाईल.

रिलायन्स जिओचे रु. 583 आणि रु. 783 प्लॅन

रु. 583 प्लॅन आणि Jio रु. 783 प्रीपेड प्लॅन त्यांच्या वैधतेशिवाय रु. 333 प्लॅन सारखेच आहेत. 583 रुपयांच्या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 56 दिवसांची वैधता मिळते, तर 783 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 84 दिवसांची वैधता मिळते.

या दोन प्लॅनसह प्राइम सबस्क्रिप्शन मोफत दिले जात नाही आणि नवीन वापरकर्त्यांना प्राइम मेंबरशिपसाठी 100 रुपये आकारले जातील.

Updated : 9 May 2022 1:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top