Home > Tech > Jio चा एक रुपयात 30 दिवसांची वैधता देणार नवीन प्लॅन नक्की काय आहे..

Jio चा एक रुपयात 30 दिवसांची वैधता देणार नवीन प्लॅन नक्की काय आहे..

Jio चा एक रुपयात 30 दिवसांची वैधता देणार नवीन प्लॅन नक्की काय आहे..
X

Jio ने आता 1 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 100MB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन जिओच्या मोबाईल अॅपवर सध्या उपलब्ध असून हा पॅक व्हॅल्यू विभागात इतर योजनांच्या अंतर्गत आहे.

याच बरोबर 10 रुपयांच्या प्लॅन मध्ये तुम्हाला 1GB डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 10 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळेल. म्हणजेच, जर तुम्ही 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10 वेळा रिचार्ज केले तर तुम्हाला 1GB डेटा मिळेल. सध्या 1GB डेटासाठी 15 रुपयांचा प्लान घ्यावा लागत होता. पण आता 1 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये तुम्ही 5 रुपये वाचवू शकता.

119 रुपयांचा सुद्धा प्लॅन उपलब्ध

काही दिवसांपूर्वी, Jio ने आपल्या सर्वात डेटा प्रीपेड प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे, ज्याची किंमत 119 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह युजरला दररोज 1.5GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला १४ दिवसांची वैधता मिळते. इतर फायदे म्हणून Jio अॅप्सचा मोफत प्रवेश देखील देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये 300 एसएमएसही देण्यात येत आहेत.

1 डिसेंबरला प्लॅन महाग झाले होते

Airtel आणि Vi (Vodafone-Idea) नंतर, Jio ने देखील 1 डिसेंबरपासून रिचार्ज योजना महाग केल्या आहेत. जिओने आपल्या प्लॅनमध्ये 21% पर्यंत वाढ केली आहे. Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनसाठी 1 डिसेंबरपासून 91 रुपये भरावे लागत आहेत. 129 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 155 रुपये, 399 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 479 रुपये, 1,299 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 1,559 रुपये आणि 2,399 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 2,879 रुपये असून डेटा टॉप-अपच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. आता 6 GB डेटासाठी 51 ऐवजी 61 रुपये, 12 GB डेटासाठी 101 ऐवजी 121 रुपये आणि 50 GB डेटाची किंमत 251 ऐवजी 301 रुपये इतका आहे.

Updated : 16 Dec 2021 2:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top