Home > Tech > Mercedes-Benz ची सर्वात Powerful कार लॉन्च.. ।Mercedes AMG GT 63 SE

Mercedes-Benz ची सर्वात Powerful कार लॉन्च.. ।Mercedes AMG GT 63 SE

Mercedes-Benz ची सर्वात Powerful कार लॉन्च.. ।Mercedes AMG GT 63 SE
X

जर्मन लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज बेंझने (Mercedes-Benz) मंगळवारी (11 एप्रिल) भारतीय बाजारपेठेत मर्सिडीज AMG GT 63 SE परफॉर्मन्स फोर-डोर कूप लाँच केली. कंपनीने ही कार 3.30 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल मर्सिडीज कार असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग केवळ 2.9 सेकंदात घेऊ शकते. त्याच वेळी, त्याचा टॉप स्पीड 316 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
मर्सिडीज AMG GT 63 SE: इंजिन कसे आहे?

मर्सिडीज AMG GT 63 SE परफॉर्मन्स 4.0-लिटर ट्विन टर्बो v8 इंजिनसह येतो. तसेच, यात एक्सल-माउंटेड 204hp इलेक्ट्रिक मोटर आहे. दोन्ही इंजिन मिळून 1470 Nm पीक टॉर्कसह 831 bhp पॉवर जनरेट करतात. कंपनीचा दावा आहे की ही कार केवळ ईव्ही मोडमध्ये 130 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने 12 किलोमीटर धावू शकते. त्याच वेळी, या कारमध्ये स्लिपरी, कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट+, इलेक्ट्रिक आणि रेस असे 7 ड्राइव्ह मोड उपलब्ध आहेत.

मर्सिडीज AMG GT 63 SE : इंटीरियर कसे आहे?

नवीन मर्सिडीज AMG GT 63 SE परफॉर्मन्सच्या इंटिरिअरमध्ये AMG बॅजिंगसह कार्बन फायबर स्पोर्ट्स सीट्स आणि अल्कंटारा इन्सर्टसह AMG ट्रीटमेंट मिळते. तसेच, यात शॉर्टकट डायल्ससह AMG मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील मिळते. AMG GT 63 SE परफॉर्मन्सला दोन 12.4-इंच स्क्रीन असून एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी आणि दुसरी इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आहे..

Updated : 12 April 2023 1:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top