Home > Tech > Iphone 14 च्या नव्या लिक ने इटरनेटवर उडवलीये धमाल!

Iphone 14 च्या नव्या लिक ने इटरनेटवर उडवलीये धमाल!

Iphone 14 च्या नव्या लिक ने इटरनेटवर उडवलीये धमाल!
X

Apple कंपनीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. दरवर्षी ऍपल आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन आयफोनचे नवीन मॉडेल बाजारात आणते. आयफोन 13 या वर्षी लॉन्च झाला. आता 2022 मध्ये लॉँच होणार्या आयफोन 14 चे फीचर्स लॉंच होण्यापूर्वीच लीक झाले होते. आज आम्ही तुम्हाला लेटेस्ट लीक बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये iPhone 14 च्या डिस्प्लेशी संबंधित फीचर आहे.

Tech page Concepts iPhone ने अलीकडेच एक डिझाईन ट्रेलर सादर केला आहे ज्यामध्ये हे स्पष्ट केले आहे की iPhone 14 आणि iPhone 14 Pro मध्ये दोन स्क्रीन असू शकतात. ही दोन्ही उपकरणे दुय्यम स्लाइडर स्क्रीनसह येऊ शकतात. यासोबतच एअर चार्जिंग तंत्रज्ञानही या आयफोनमध्ये येऊ शकते.

दोन स्क्रीनचे फायदे

ऍपल स्लाइडर स्क्रीन का आणत आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की या फीचरद्वारे वापरकर्ते दुसऱ्या स्क्रीनचा कीबोर्ड किंवा कंट्रोलर म्हणून आरामात वापर करू शकतील. जेणेकरून तुम्हाला गेममध्ये चांगली जागा मिळेल. तसेच, जर दोन स्क्रीन असतील, तर तुम्ही एकाच वेळी पूर्ण स्क्रीनमध्ये दोन अॅप्स ऍक्सेस करू शकाल.

iPhone 14 ला एअर चार्जिंग तंत्रज्ञान मिळू शकते

एअर चार्जिंग तंत्रज्ञानाचा अर्थ असा आहे की वापरकर्ते 2022 मध्ये लॉन्च होणार्यात आयफोनमध्ये कोणत्याही वायर, चार्जिंग केबल किंवा चार्जिंग स्टँडशिवाय त्यांचे फोन चार्ज करण्यास सक्षम असतील. अॅपलने या फीचरबद्दल आधीच सांगितले असले तरी या नवीन कॉन्सेप्ट डिझाईनमध्ये अधिक बँडविड्थ असलेले चार्जिंग पॅड देण्यात आले आहे, जे लांबूनही फोन चार्ज करण्यास सक्षम असेल.

iPhone 14 Apple चा पुढील iPhone लाँच असू शकतो आणि तो 2022 मध्ये लाँच केला जाईल. सध्या कंपनीकडून अधिकृतरीत्या या फोनबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Updated : 29 Nov 2021 12:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top