Home > Tech > अनेकांच्या हृदयात जागा निर्माण करणारी अ‍ॅम्बेसेडर आता पुन्हा धावणार, पहा अशी असणार आहे नवीन कार..

अनेकांच्या हृदयात जागा निर्माण करणारी अ‍ॅम्बेसेडर आता पुन्हा धावणार, पहा अशी असणार आहे नवीन कार..

अनेकांच्या हृदयात जागा निर्माण करणारी अ‍ॅम्बेसेडर आता पुन्हा धावणार, पहा अशी असणार आहे नवीन कार..
X

अ‍ॅम्बेसेडर ही केवळ गाडी नसून तिच्याशी अनेकांच्या भावना जोडलेल्या आहेत. याच अ‍ॅम्बेसेडर ने 2014 मध्ये आपले उत्पादन बंद केले. आता 8 वर्षानंतर पुन्हा एकदा अॅम्बेसेडर बाजारात येत आहे. फ्रेंच कंपनी Peugeot आणि हिंदुस्तान मोटर्स संयुक्तपणे 2024 पर्यंत अॅम्बेसेडरची इलेक्ट्रिक कार आणत आहेत.
या गाडीची एक वेगळीच ओळख आहे. हिंदुस्थान मोटर्सने १९५८ मध्ये अँबेसिडर कारचे उत्पादन करण्यास सुरुवात केली व कंपनीने २०१४ पासून या कारचं उत्पादन बंद केलं. म्हणजेच जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ही कार भारतीय बाजारावर, इथल्या लोकांवर अगदी अधिराज्य गाजवत होती.या कारला ७ जनरेशन अपडेट्स देण्यात आले होते. ही भारताची सर्वात आवडती कार होती. ही कार बाजारातून बाहेर गेल्यावर अनेकांना वाईट वाटलं होतं. मात्र ज्यांची अ‍ॅम्बेसेडर घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती त्यांना आता पुम्हा एकदा संधी मिळणार आहे आपलं अपार स्वप्न पूर्ण करण्यासाठी. भारतीयांची आवडती आणि लाडकी कार पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. कंपनी नव्या अवतारात ही कार लाँच करणार आहे.

Updated : 7 Jun 2022 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top