Home > Sports > IND vs WI, भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज...

IND vs WI, भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज...

IND vs WI,  भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज...
X

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज बुधवारी महिला टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना खेळणार आहे. ब गटातील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता केपटाऊनच्या मैदानावर खेळवला जाईल. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ते टॉप-2 च्या शर्यतीत पुढे येऊ शकतो. या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध ७ विकेटने मोठा विजय मिळवला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी पहिली तर ती अत्यंत चांगली आहे. गेल्या 7 वर्षांपासून कॅरेबियन संघाविरुद्ध भारतीय संघ हरलेला नाही. अलीकडेच तिरंगी मालिकेतही भारताने विंडीजला दोनदा पराभूत केले होते. विंडीजविरुद्ध भारतीय संघाचा शेवटचा पराभव 2016 मध्ये विजयवाडा येथे झाला होता.

सर्वात आधी टीम इंडियाची मजबूत व कमकुवत बाजू काय पाहू..

मजबूत बाजू म्हणजे टीम इंडियाची टॉप ऑर्डर ही त्याची सर्वात मजबूत बाजू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात भारतीय टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली होती. मधल्या फळीतील फलंदाजांनीही दडपणाखाली चांगली फलंदाजी केली. वेस्ट इंडिजचा संघ अनेकदा मोठ्या सामन्यांच्या दबावाखाली तुटून पडतात. गोलंदाजांना इतक्या विकेट्स घेता येत नाहीत. कॉमनवेल्थ गेम्स 2022 आणि ICC वर्ल्ड कप 2017 च्या अंतिम टीमसोबत असंच झालं होतं.

हवामान अहवाल आणि खेळपट्टीची स्थिती काय आहे?

बुधवारी केपटाऊनमध्ये ढगाळ वातावरण असू शकते, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. तेथील तापमान 18 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. खेळपट्टीच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक जिंकणारा संघ शक्यतो गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल, कारण प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावर 18 सामने जिंकले आहेत..

Smriti Mandhana मैदानात परंतु शकते..

एका दिवसापूर्वी डब्ल्यूपीएल खेळाडूंच्या लिलावात 3.4 कोटी रुपयांची बोली लागलेल्या भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकते. बोटाच्या दुखापतीमुळे ती पहिला सामना खेळू शकली नाही. टीम इंडियाचे प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर यांनी बोटाला फ्रॅक्चर नसल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत ती आज खेळण्याची शक्यता जास्त आहे.

Updated : 15 Feb 2023 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top