Home > Sports > IPL पाहता येणार एकदम फ्री फ्री फ्री..

IPL पाहता येणार एकदम फ्री फ्री फ्री..

IPL पाहता येणार एकदम फ्री फ्री फ्री..
X

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची पर्वणी म्हणजे IPL.. बरोबर ना? अरे हे पण आम्ही काय विचारतोय असे कित्येक लोक आहेत जे याची कधी पासून वाट बघतायत.. अनेकांनी तर पहिली मॅच पाहण्याचा जोरदार बेत देखील केला आहे. पण हे mobile वर पाहण्यासाठी सर्वांनाच एक अडचण आहे ती म्हणजे subscription.. त्यामुळे आता अनेक लोक विचार करत असतील आता IPL आहे म्हंटल्यावर या महिन्यात खिसा थोडा आणखीन खाली होणार.. पण तो डायलॉग आठवतोय का.., रुको जरा सबर करो... होय व्हिडिओ पूर्ण बघा IPL एकदम फ्री बघता येणारे.. कसं? कुठं? सगळं सांगतो...

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आजपासून सुरू होत आहे. यावेळी 4K मध्ये तुम्हाला आयपीएलचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग असेल. Jio Cinema हा IPL 2023 चा अधिकृत लाइव्ह-स्ट्रीमिंग साठी भागीदार आहे. तुम्ही Jio वापरकर्ते नसले तरीही, तुम्ही Jio सिनेमावर IPL चा आनंद घेऊ शकाल. यासाठी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये फक्त इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर दोन प्रकारे मॅच पाहता येणार एकदम फ्री...

तुम्हाला आयपीएलचे सामने मोफत बघायचे असतील तर 2 मार्ग आहेत. प्रथम- तुम्हाला Jio Cinema अॅप डाउनलोड करावे लागेल. दुसरा- तुम्ही थेट जिओ सिनेमाच्या वेबसाइटवर जाऊन मॅचचा आनंद घेऊ शकता. Airtel, Jio, VI आणि BSNL सह इतर कोणत्याही कंपन्यांचे वापरकर्ते देखील सर्व सामने विनामूल्य ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. मग आता ही माहिती तुम्हाला आम्ही दिली तुमचं खिसा हलका होण्यापासून वाचवलं मग आता कसला विचार करताय.. आमच्या चॅनेलला एक like तर झालाच पाहिजे ना..?

Updated : 1 April 2023 2:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top