Home > Sports > भारताची कसोटी स्पर्धा क्रमवारीत 'भरारी'!

भारताची कसोटी स्पर्धा क्रमवारीत 'भरारी'!

ऑट्रेलिया विरूद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ असं नमवलं. भारताच्या यंगिस्तानची जबरदस्त कामगीरी.

भारताची कसोटी स्पर्धा क्रमवारीत भरारी!
X

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केला आहे. आधी विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाला वन-डे मालिकेत हार पत्करावी लागली होती. त्यानंतर भारताने हा पराभव जिव्हारी लावून घेत, २०-२० आणि कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात नमवलं आहे. विशेष म्हणजे भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताना धडाकेबाज कामगिरी केली आहे.

भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात सर्वात कमी 36 रन बनविले होते, परंतु तिथे न खचता भारतीय संघाने जी उभारी घेतली ती अद्भुत आहे. जिथे पहिल्याच सामन्यात हे हाल झाले त्यानंतर न खचता ती मालिका अक्षरशः भारतीय संघाने खेचून आणली.

या कसोटी मालिकेच्या विजयानंतर एक गोष्ट अधोरेखित होते की हा "टीम वर्क" चा विजय होता. भारताचा पुर्णवेळ कॅप्टन विराट कोहली आणि इतर दिग्गज खेळाडूंची अनुपस्थितीत, तसेच अनेक खेळत असलेले खेळाडू दुखापत ग्रस्त असताना सर्वांनी आपल्या जवाबदारी ला न्याय दिला. त्यामुळे या कसोटी सामन्यांच्या रोमहर्षक विजयातून भारतीय संघातील नविन तरुण खेळाडूंनी आपली चमक पूर्ण मालिकेत दाखवली आहे.

या सर्वात विशेष म्हणजे भारताने मिळवलेला हा सांघिक विजय आहे आणि या संघाच्या नेत्रुत्वाची धुरा "अजिंक्य" राहाणेनं केली आहे. दिग्गजांच्या अनुपस्थितीत अजिंक्यने त्याच्या बुदधीचा योग्य वापर करत भारतीय संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर तर काढलंच, पण त्याच बरोबरीने विजय देखील आपल्या नावावर केला आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि टीम इंडियाने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे सहज गाठले.

शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी दुसऱ्या डावांत ९ बळी घेत ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक आणि संयमी फंलदाजी करत विजय खेचून आणला. ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

भारताने कसोटी मालिका जिंकून जागतिक कसोटी स्पर्धेत ४७० अंकासंह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. फलंदाज रिषभ पंत, शुभमन गिल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज या नव्या खेळांडूच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला ही ऐतिहासिक कामगिरी करता आली आहे.

Updated : 19 Jan 2021 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top