Home > Sports > U-19 Women's T20 विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर..

U-19 Women's T20 विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर..

U-19 Womens T20 विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर..
X

भारतरत्न, क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी महिला अंडर-19 क्रिकेट संघाचा सत्कार केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाचे सर्व खेळाडू टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पोहोचले. खेळाडूंचा सन्मान करण्यासोबतच बीसीसीआयने ५ कोटी रुपयांचा धनादेशही संघाला सुपूर्द केला.

विजय अनेक वर्षे लक्षात राहील

महिला संघाचा सन्मान करण्यासाठी सचिन तेंडुल आले होते यावेळी ते म्हणाले की, 'महिला विश्वचषक जिंकल्याबद्दल मी अंडर-19 महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. तुमचे हे यश देशभर वर्षानुवर्षे स्मरणात राहील. माझे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न 1983 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी सुरु झाले. विश्वचषक जिंकून तुम्ही देशातील अनेक युवा महिला खेळाडूंच्या स्वप्नांना पंख दिले आहेत.

उपुढे बोलताना ते म्हणाले, 'तुम्हाला पाहून भविष्यात अनेक महिला खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळेल. शांता रंगास्वामी, डायना एडलजी, मिताली राज आणि इतर अनेक खेळाडूंनी एक मार्ग मोकळा केला. ज्याचे पालन करून तुम्ही सर्वांचे क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले.

WPL महिला क्रिकेट बदलेल..

बीसीसीआयने ही स्पर्धा जिंकल्याबद्दल अंडर-19 महिला क्रिकेट संघ आणि सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने सर्वतोपरी मदत केल्याचे सचिनने सांगितले. त्यांनी महिला प्रीमियर लीग सुरू करण्याचे पाऊल उचलले. महिला प्रीमियर लीगमुळे भारतासह जगभरातील महिला क्रिकेट बदलणार आहे. WPL साठी सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा आणि अंडर-19 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन.

भारतीय महिला संघाची पहिली जागतिक ट्रॉफी

भारतीय महिला संघ प्रथमच सर्वच स्थरांमध्ये विश्वविजेता बनला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला सीनियर स्तरावर कधीही वर्ल्ड कप जिंकता आला नाही. भारताने याआधी २००५ आणि २०१७ एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळली होती पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

Updated : 2 Feb 2023 3:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top