Home > Sports > Happy Birthday MS Dhoni :सर्वात आवडता कर्णधार

Happy Birthday MS Dhoni :सर्वात आवडता कर्णधार

Happy Birthday MS Dhoni :सर्वात आवडता कर्णधार
X

भारतातील सर्वात आवडता कर्णधार म्हटलं तर महेंद्रसिंह धोनी . आज महेंद्रसिंहचा वाढदिवस आहे . यानिमित्ताने सुशांतसिंगची सुद्धा आठवण होत आहे.MS Dhoni धोनी नावाचा चित्रपट खूप गाजला . त्यामध्ये MS Dhoni ची भूमिका म्हणजे सुशांतसिंगने केली होती . आज सुशांत नसला तरी या ना त्या कारणाने तो जिवंत आहे.

MS Dhoni चा दुसरा पार्ट सुद्धा येणार आहे. आज वाढदिवस असल्याने MS Dhoni ला आज सोशल मीडिया पासून अनेक लोकांच्या स्टेटस वर महेंद्रसिंगच्या पोस्ट आपल्याला दिसत आहेत .

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची क्रेझ फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटपासून दुरावलेला धोनी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या अनेक लोकप्रिय फॉरमॅटपासून तो दूर गेला असला, तरी त्याची इनिंग अजून संपलेली नाही. आज धोनी हे एक ब्रॅंड नाव झालं आहे.

कितीतरी कोटींहून अधिक आहे धोनीची मार्केट व्हॅल्यू

जाहिरात विश्वात अनेक क्रिकेटपटू पाय ठेवतात . पण धोनीच्या अनेक जाहिराती पाहिलात तर तुम्हाला कळेल लोक किती धोनीला पसंत करतात. महेंद्रसिंह धोनी सध्या 35 हून अधिक ब्रँड्सची जाहिरात करतोय. महेंद्रसिंह धोनीने जरी निवृत्ती घेतली असली तरी निवृत्तीनंतरही 'धोनी' या ब्रँडचे मूल्य वाढत आहे. प्रत्येक ब्रँडच्या जाहिराती मागे धोनीचा चेहरा आपल्याला नेहमी दिसतो .

सोशल मीडियामध्ये सुद्धा धोनी मागे नाही. महेंद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर जवळपास 75 कोटींहून अधिक लोक फॉलो करतात.

Updated : 7 July 2023 7:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top