Home > Sports > #FIFA2022 गर्लफ्रेंडसोबत नाही आईसोबत मैदानात नाचला हा खेळाडू ...

#FIFA2022 गर्लफ्रेंडसोबत नाही आईसोबत मैदानात नाचला हा खेळाडू ...

#FIFA2022 गर्लफ्रेंडसोबत नाही आईसोबत मैदानात नाचला हा खेळाडू ...
X

फिफा वर्ल्ड कप 2022 सध्या कतार मध्ये सुरू आहे यावेळी 2022 मधील तिसरा उपांत्यपूर्व सामना शनिवारी खेळला गेला. या सामन्यात क्रिस्टीयानो रोनाल्डो पोर्तुगाल आणि मोरोक्को यांच्यात सामना झाला या सामन्यात मात्र पोर्तुगाल जिंकला नसून मोरोको संघाचा विजय झाला या विजयानंतर बौफल या मोरोक्को देशाच्या खेळाडूने आपल्या आईसोबत डान्स केला ...जो विडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे .

तस पाहता रोनाल्डोची टीम जिंकेल हाच विश्वास सर्वांना असताना मोरोक्कोच्या संघाने इतिहास रचला आहे .आणि पोर्तुगालचा पराभव करत विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन देश ठरला आहे .

या सगळ्यात मोरोक्कोचा खेळाडू बाउफल त्याच्या आईसोबतच डान्स जगभर प्रसिद्ध झाला आहे .अनेक मोठे स्टार प्लेयर आपल्या सामना जिंकल्यानंतर आपल्या प्रियसी सोबत डान्स करताना ,भेटताना चे व्हिडिओ व्हायरल होतात ...पण आपल्या आई सोबत नृत्य करताना मोरोकोच्या बौफल या खेळाडूचा हा व्हिडिओ जगभर पसंद केला जात आहे ..

Updated : 13 Dec 2022 11:00 AM GMT
Next Story
Share it
Top