Home > Sports > महाराष्ट्राची लेक सारिका काळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

महाराष्ट्राची लेक सारिका काळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

महाराष्ट्राची लेक सारिका काळेला अर्जुन पुरस्कार जाहीर
X

भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सारिका काळे हिने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संघाला सतत विजय मिळवून दिला आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्याच्या गौरवात भर पडली असल्याची भावना आहे.

सारिका ही मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर या गावाची आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सारिकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलं आहे. साल 2015-16 मध्ये प्रथमच भारतीय संघात निवड व भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. सन 2016 मध्ये आसाम गोहाटी येथे खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी कामगिरी बजावली आहे.

सारिकाचा क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यामुळे राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारासह अन्य पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे. शासनाने तिचा गौरव करत तालुका क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती केली. सारिता सध्या तुळजापूर तालुका क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार तिला २९ ऑगस्टला दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.

Updated : 20 Aug 2020 9:49 AM GMT
Next Story
Share it
Top