Home > Sports > चाहत्यांच्या आग्रहाखातर कोहली मैदानात उतरला...

चाहत्यांच्या आग्रहाखातर कोहली मैदानात उतरला...

चाहत्यांच्या आग्रहाखातर कोहली मैदानात उतरला...
X

टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय नोंदवला. या ऐतिहासिक विजयाचे अनेक रोमांचक क्षण चाहत्यांना पाहायला मिळाले. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या सामन्यात विराट कोहली चाहत्यांच्या आग्रहाखातर क्षेत्ररक्षण करताना दिसला. त्यासाठी कारणीभूत होतं चाहत्यांचा आग्रह...

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय टीम फिल्डिंग करत असताना काही चाहते 'मिस यू कोहली' असे बॅनर दाखवताना दिसले. त्यानंतर काहीच वेळात कोहली मैदानात उतरला. 17व्या षटकानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला.. चाहत्यांसाठी मैदानात आलेल्या कोहलीने अनेकांची मने जिंकली...

Updated : 2 Aug 2023 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top