Home > Sports > प्रिती झिंटाने विकत घेतला शाहरुख खान

प्रिती झिंटाने विकत घेतला शाहरुख खान

नेटकरी म्हणतात “वीर- झारा अखेर भेटले”

प्रिती झिंटाने विकत घेतला शाहरुख खान
X

आयपील 2021च्या लिलावाला जोरदार सुरुवात झाली. पंजाब किंगस् संघाने तामिलनाडूमधील शाहरुख खान याला 5.25 करोडला विकत घेतलं आहे. पंजाब किंगस्ची मालकीण प्रिती झिंटाने शाहरुख खानवर 5.25 करोड रुपयांची मोठी बोली लावत त्याला विकत घेतलं.

खेळाडू शाहरुख खानची बेस प्राइज 20 लाख रुपये इतकी होती. पण नंतर त्याची बोली 5.25 कारोडला लागली. तर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान हा प्रतिस्पर्धी संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे.

ट्विटरवर ही बातमी पसरताच चाहत्यांनी खेळाडू शाहरुख खानचे कौतुक केले आणि अभिनेता शाहरुख खान आणि प्रिती झिंटाच्या हिट चित्रपटाला उल्लेख देत "वीर- झारा शेवटी भेटले" अशी खिल्ली ही उडवली.


Updated : 19 Feb 2021 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top