Home > Sports > Women World Cup 2022 : भारताची मजल २७७ पर्यंत...कर्णधार मितालीसह तिघींची अर्धशतकं

Women World Cup 2022 : भारताची मजल २७७ पर्यंत...कर्णधार मितालीसह तिघींची अर्धशतकं

ऑस्ट्रेलियाविरूध्द भारताची फलंदाजी चमकली असून मिताली राज, हरमनप्रीत आणि यश्टीकाच्या अर्धशतकांच्या बळांवर २७७ धावांची संख्या उभारली आहे.

Women World Cup 2022 : भारताची मजल २७७ पर्यंत...कर्णधार मितालीसह तिघींची अर्धशतकं
X

विश्वचषकामध्ये जर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर आज कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरूध्द भारताला विजय मिळवावाच लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. पण डावाची सुरूवात करताना भारताच्या आघाडीच्या फलंदाज अयशस्वी ठरल्या. मागील चार पैकी दोन सामन्यात ढेपाळलेली भारताची फलंदाजी आजही अयशस्वी ठरते की काय असं वाटत असतानाच कर्णधार मिताली राज आणि यश्टिका भाटीया या दोघींनी भारताचा डाव सावरला. यानंतर अष्टपैलू हरमनप्रीत कौरने देखील अर्धशतकीय खेळी करत ५० षटकांत सात विकेट गमावत २७७ धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान ठेवलं आहे.



सुरुवातीला दोन विकेट झटपट गमावल्यावर यास्तिका भाटिया आणि मिताली राज यांनी आणखी पडझड न होऊ देता संयमी अर्धशतकी खेळी करत १५० चा पल्ला गाठून दिला. मग त्यानंतर हरमनप्रीत कौरने ४७ धावांत ६ चौकार लगावत ५७ धावांची झटपट खेळी केल्याने भारताने २७७ चा पल्ला गाठला. तर पुजा वस्त्राकर हीने दोन षटकात आणि एक चौकार लगावत २८ चेंडून ३४ धावा चोपत हरमनप्रीत कौरला चांगली साथ दिली.


तर ऑस्ट्रेलियातर्फे डेरिक ब्राऊन हिने ३० धावांत ३ बळी मिळवले. भारतीय फलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरी फिकी पडलेली बघायला मिळाली. दरम्यान २७७ धावांचा पाठलाग करतांना ऑस्टेलियाने आक्रमक सुरुवात केली असून अवघ्या पंचवीस षटकांत २ गड्यांच्या बदल्यात १४१ धावांचा पल्ला पार केला आहे. भारताने हा सामना गमावला तर पुढील दोन सामन्यांत चांगल्या फरकाने विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल.




Updated : 19 March 2022 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top