Home > Sports > भारतीय महिला क्रिकेट संघाला आज जगज्जेतेपदाची संधी..

भारतीय महिला क्रिकेट संघाला आज जगज्जेतेपदाची संधी..

भारतीय महिला क्रिकेट संघाला आज जगज्जेतेपदाची संधी..
X

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अंडर-19 महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. त्याचवेळी रोमहर्षक उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 धावांनी पराभव केला. भारत आणि इंग्लंड हे या स्पर्धेतील टॉप-2 संघ ठरले आहेत. या दोघांच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवलेले आपल्याला पाहायला मिळाले.

यजमानाचा पराभव करून सुरुवात केली..

भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात 167 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने 16.3 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले. त्यानंतर भारताने यूएईचा 122 आणि स्कॉटलंडचा 83 धावांनी पराभव करून अव्वल स्थान पटकावले.

ऑस्ट्रेलियाचा एकमेव पराभव..

टीम इंडिया 4 गुणांसह सुपर-6 मध्ये पोहोचली. जिथे पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ गडी राखून पराभव केला होता. सुपर-6 टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 20 षटकात केवळ 59 धावा करू दिल्या. त्यानंतर टीम इंडियाने 7.2 षटकांत 7 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ७ विकेट राखून पराभव केला.

या स्पर्धेत इंग्लंडने एकही सामना गमावला नाही..

इंग्लंडने स्पर्धेतील त्यांचे सर्व म्हणजे 6 सामने जिंकले आहेत. अगदी सर्व सामन्यात देखील त्यांना अपयश आलेले नाही. ब गटात संघाने झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि रवांडा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्याचबरोबर सुपर-6 टप्प्यात त्यांनी आयर्लंड आणि वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता..

टीम इंडियाची फलंदाजी दमदार आहे..

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत उतरला आहे. शफालीने उपकर्णधार श्वेता सेहरावतसह संपूर्ण स्पर्धेत जोरदार फलंदाजी केली आहे. श्वेताने अनेक प्रसंगी महत्त्वाच्या खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर सौम्या तिवारी, ऋचा घोष आणि गोंगडी त्रिशा याही फलंदाजीतील भारताच्या मजबूत दुव्या आहेत.

दुसरीकडे, इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या कर्णधार ग्रेस श्रीवानने स्पर्धेतील 6 सामन्यात 289 धावा केल्या. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या, नाबाद 93, ही देखील तिच्याच नावावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या सामन्यात तिनेच गोलंदाजी करत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट घेतली होती. अशा स्थितीत गोलंदाजी करताना भारताला श्रीवनला लवकरात लवकर रोखावे लागणार आहे..


Updated : 29 Jan 2023 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top