Home > Sports > IND-W vs WI -W: लंडनमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमचे विजयी वर्चस्व...

IND-W vs WI -W: लंडनमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमचे विजयी वर्चस्व...

IND-W vs WI -W: लंडनमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमचे विजयी वर्चस्व...
X

भारतीय महिला क्रिकेट संघानं T20 त्रिस्तरीय मालिकेत सलग दुसरा विजय नोंदविला आहे.वेस्टइंडिजच्या संघाचा ५६ धावांनी पराभव करतांना भारतीय महिला संघानं मालिकेत वर्चस्व कायम राखले आहे.

भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करतांना २० षटकात २ गडी बाद १६७ धावा केल्या आहेत. यात सामनावीर स्मृती मनधाना (Smriti Mandhana) ने ७४ धावा काढल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने ३५ चेंडूत ५६ धावा काढल्या आहेत. तर वेस्टइंडिच्या संघाची मजल ४ गडी बाद १११ पर्यंतच पोहोचली आहे. दरम्यान, स्मृती आणि हरमनप्रीत यांनी ११५ धावांची नाबाद भागीदारी केली.

स्मृतीनं १४५ च्या सरासरीनं आपल्या ७४ धावांच्या खेळीत १० चौकार आणि १ षटकार मारला. तर हरमनप्रीतनं ५६ धावात ८ चौकार मारले आहेत.

भारतीय गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने २९ धावांत २ बळी तर राजेश्वरी गायकवाडनं (Rajeshwari Gayakwad) नं १६ धावात १ बळी घेतला. वेस्टइंडिजकडून शिमाईन कॅम्पबेल (Shemaine Campbelle) आणि मॅथ्यूज (Matthews) यांनी अनुक्रमे ४७ आणि ३४ धावा काढून थोडाफार संघर्ष केला आहे.

Updated : 24 Jan 2023 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top