Home > Sports > हार्दिक पांड्याला अश्रू अनावर, भर मैदानात डोळ्यात पाणी.. । Hardik Pandya

हार्दिक पांड्याला अश्रू अनावर, भर मैदानात डोळ्यात पाणी.. । Hardik Pandya

हार्दिक पांड्याला अश्रू अनावर, भर मैदानात डोळ्यात पाणी.. । Hardik Pandya
X

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ४ धावांनी हरला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनेक भावनिक, मनोरंजक आणि मजेदार क्षण पाहायला मिळाले. यावेळी मैदानावर एक भावनिक क्षण सुद्धा पाहायला मिळाला. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या हा सामन्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभा होता आणि राष्ट्रगीता दरम्यान तो अत्यंत भावुक झाला आणि रडू लागला. हार्दिक पांड्याचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर समोर आला आहे. सामना सुरू झाल्यानंतर टिळक वर्मा ज्याने नुकतंच पदार्पण केलं त्याच्या खेळाने सर्वांनाच आश्चर्य वाटलं कारण की त्यांना पहिल्याच सामन्यात षटकारसह आपलं खातं उघडलं. तसेच, 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या युझवेंद्र चहललाही कर्णधार पंड्याने न खेळता मैदानाबाहेर बोलावले, कारण हार्दिकला मुकेश कुमारला वर पाठवायचे होते, पण नंतर चहलला पंचांच्या आदेशानुसार फलंदाजी करावी लागली. असं सगळं match दरम्यान पाहायला मिळाले...

Updated : 4 Aug 2023 5:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top