Home > Sports > IND vs Pak : टीम इंडियाने 18 चेंडूत 42 धावा करून सामना फिरवला, जेमिमाने करून दिली कोहलीची आठवण

IND vs Pak : टीम इंडियाने 18 चेंडूत 42 धावा करून सामना फिरवला, जेमिमाने करून दिली कोहलीची आठवण

IND vs Pak : टीम इंडियाने 18 चेंडूत 42 धावा करून सामना फिरवला, जेमिमाने करून दिली कोहलीची आठवण
X

India vs Pakistan woman T-20 World Cup : दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट राखून धुव्वा उडवला.

ऋचा घोष (Rucha Ghosh) ने केलेल्या धुंवाधार फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने १९ षटकात १५१ धावा करत विजय साजरा केला.

पाकिस्तान (pakistan) महिला संघाने २० षटकात ४ विकेटच्या बदल्यात १४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऋचा घोषने २० चेंडूत ५ खणखणीत चौकारासह ३१ धावा करत विजय साजरा केला.

पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तानच्या टीमची सुरुवात खराब झाली. त्यातच दुसऱ्या ओव्हर मध्ये दीप्ती शर्माच्या (Deepti Sharma) चेंडूवर जवेरिया खान आऊट झाली. त्यानंतर राधा यादवने (Radha Yadav) ऋचा घोषच्या हातून मुनिबा अलीला (muniba ali)स्टंप आऊट केले. पुढे पुजा वस्त्राकर (pooja vastrakar)ने निदा डार ला खातंही खोलू दिले नाही. मात्र यानंतर सिदरा अमीनची (sidara ameen) ११ रणांवर विकेट मिळवली. (Pakistan won toss)

अखेर बिस्माह(Bismaah and aayesha) आणि आयशा यांनी ४७ चेंडूत ८५ धावांची भागीदारी केली. त्यामूळे खराब सुरुवात होऊनही पाकिस्तान संघ २० ओव्हर मध्ये १४९ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने १५१ धावांसह विजय मिळवला.

यामध्ये Y. भाटिया (Y. Bhatiya) यांनी २० चेंडूत १७ धावा केल्या. शेफाली वर्माने (shefali Varma)२५ चेंडूत ३३ धावा केल्या. जेमिमाहने (jemimah) ३८ चेंडूत ५३ धावा, हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) ने १२ चेंडूत १६ धावा तर ऋचा घोष ने २० चेंडूत ३१ धावा करत ७ विकेट राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

Updated : 13 Feb 2023 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top