Home > Sports > भारताने वर्ल्डकप जिंकला, इंग्लंडचा दारुण पराभव...

भारताने वर्ल्डकप जिंकला, इंग्लंडचा दारुण पराभव...

भारताने वर्ल्डकप जिंकला, इंग्लंडचा दारुण पराभव...
X

भारताने पहिल्या अंडर-19 महिला क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने इंग्लंडला १७.१ षटकांत ६८ धावांत रोखले होते. त्यानंतर भारताने 14 षटकांत 3 गडी राखून लक्ष्य गाठले. सौम्या तिवारीने विजयी शॉट मारला.

टीम इंडियाकडून सौम्या तिवारी 24 धावांवर नाबाद राहिली. त्याचवेळी कर्णधार शेफाली वर्मा 15, गोंगडी त्रिशा 24 आणि उपकर्णधार श्वेता सेहरवत 5 धावा करून बाद झाली. इंग्लंडकडून हॅना बेकर, अॅलेक्स स्टोनहाउस आणि ग्रेस सर्व्हन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पॉवरप्लेमध्ये 30 धावा केल्या

पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 5 च्या रन रेटने 30 धावा केल्या. पण, कर्णधार शेफाली वर्मा आणि उपकर्णधार श्वेता सेहरावतच्या विकेट्सही गमावल्या. शेफाली 15 आणि श्वेता 5 धावा करून बाद झाली. इंग्लंडची कर्णधार ग्रेस सर्व्हेन्स आणि हॅना बेकरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Updated : 29 Jan 2023 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top