Home > Sports > Virat Kohli Vs Gautam Gambhir । विराट कोहली आणि गौतम गंभीर भर मैदानात भिडले

Virat Kohli Vs Gautam Gambhir । विराट कोहली आणि गौतम गंभीर भर मैदानात भिडले

Virat Kohli Vs Gautam Gambhir । विराट कोहली आणि गौतम गंभीर भर मैदानात भिडले
X

विराट कोहली आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir and Virat Kohli) यांच्यातील वाद 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा लखनऊमध्ये IPL सामन्यात पाहायला मिळाला. दोघेही एकमेकांसमोर आले. ५ मिनिटे जोरदार वादावादी झाली. प्रकरण इतके वाढले की LSG चा कर्णधार केएल राहुल (KL Rahul and coach Amit Mishra) आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा यांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतरही कोहली आणि गंभीर एकमेकांवर रागावलेले दिसले. याआधी 2013 मध्ये बंगळुरूमध्येही दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता.

या वादानंतर, LSG मार्गदर्शक गौतम गंभीर आणि माजी RCB कर्णधार विराट कोहली यांना IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. एलएसजीचा गोलंदाज नवीन-उल-हकलाही त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोहली आणि नवीनने आपली चूक मान्य केली आहे.


Updated : 2 May 2023 5:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top