Home > Sports > आरती केदार हिची महिला रणजी महाराष्ट्र संघात निवड

आरती केदार हिची महिला रणजी महाराष्ट्र संघात निवड

आरती केदार हिची महिला रणजी महाराष्ट्र संघात निवड
X

पाथर्डी तालुक्यातील हातराळ येथील रहिवासी आणि एम एम निराळी व बाबूजी आव्हाड विद्यालयात शिक्षण घेत असलेली आरती केदार हिची महाराष्ट्र महिला रणजी क्रिकेट संघात निवड झाली आहे. उत्तराखंड येथे होणाऱ्या एक दिवसीय स्पर्धेसाठी आरती केदार ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे तसेच तिच्यासह पाथर्डीच्या ज्ञानेश्वरी वाघ व अंबिका वाटाडे या विद्यार्थिनींचे अंडर सिक्सटीन, अंडर नाईन्टीन महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.ज्ञानेश्वरी आणि अंबिका या बडोदा, गुजरात, आसाम, ओडिसा या राज्यात महाराष्ट्र संघाकडून खेळल्या आहेत.

पाथर्डीच्या ग्रामीण भागातील मुलींनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र रणजी संघ अशी नेत्रदीपक कामगिरी केल्याने भविष्यात त्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व नक्की करतील अशी भावना विद्यालयाचे शिक्षक व क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक शशिकांत निराळी यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 10 Oct 2021 3:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top