८ वर्षांच्या स्वरालीची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
पुण्यातील ८ वर्षांच्या स्वराली ने कांस्य पदक मिळवून किक बॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचली आहे.
Max Woman | 23 March 2022 1:17 PM GMT
X
X
नुकत्याच आळंदी पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये कु. स्वराली(परी) रविंद्र इंगळे हिने कांस्य पदक जिंकलं आहे. २६ मार्च ते २९ मार्च दरम्यान हिमाचल प्रदेश, सिलोन येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आहे. तिच्या या यशामध्ये तिचे नियुद्धा कराटे आणी किकबाॅक्सिंग असोशियन चे शिक्षक महेश पडवल यांचे मार्गदर्शन व तिच्या आई वडिलांचे प्रोत्साहन मिळाले आहे. एवढ्या कमी वयामध्ये नॅशनल टुर्नामेंट मध्ये निवड झाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. ८ वर्षांची स्वराली ही फक्त दुसरी इयत्तेत शिकतेय.
Updated : 23 March 2022 1:17 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire