Home > सावित्री उत्सव > "मी या सावित्रीची उपासक"

"मी या सावित्रीची उपासक"

वट सावित्री निमीत्त मंत्री यशोमती ठाकूर यांचं खास ट्वीट

मी या सावित्रीची उपासक
X

आज वट सावित्री पूजन आहे. पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि त्याला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. आणि तिथच यमाने सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचं पूजन केलं जातं.

याच वट सावित्रीनिमीत्त राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी खास ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी "ही सावित्री तुम्हाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढून तुमच्या मृत बुद्धीला पुन्हा जीवंत करण्याचं सामर्थ्य देते. मी या सावित्रीची उपासक आहे." असं म्हटलं आहे.

त्यामुळे यशोमती ठाकूर यांचं हे ट्वीट आपल्याला खऱ्या सावित्रीची जाणिव करुन देतं.

Updated : 24 Jun 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top