Home > सावित्री उत्सव > सावित्री उत्सव : माझा जोतिबा निसार अली

सावित्री उत्सव : माझा जोतिबा निसार अली

सध्या लव्ह जिहादची चर्चा आहे. पण आज आम्ही “सावित्री उत्सव” या सिरीजमध्ये अशा सावित्रीची ओळख करुन करुन देणार आहोत जीने मुस्लिम घरात लग्न केले. त्यांच्या घरी ईद ही होते आणि गणपती सुध्दा येतात. जोती-सावित्रीने प्लेगच्या काळात लोकांना खुप मदत केली. त्यांचाच आदर्श घेऊन या जोडीनेसुध्दा कोरोना काळात लोकांची सेवा केली..

सावित्री उत्सव : माझा जोतिबा निसार अली
X

माझे नाव वैशाली महाडिक आणि माझा जोतिबा निसार अली. या माझ्या जोतिबा ने मला समाजात माझे अस्तित्व कायम ठेवून समाजात माझी स्वतःची ओळख राखून जगण्यास शिकवले. आमच्या लग्नाला 17 वर्षे झाले.आम्ही special marriage act नुसार नोंदणी पद्धतीने लग्न केलं.त्यानंतर आमच्या जीवनात अनेक उतार चढाव आले.पण आम्ही न डगमगता प्रत्येक परिस्थिती वर मात करीत आलो.5 वर्षाने आमच्या आयुष्यात छोट्या सावित्रीने पदार्पण केले.ती 5/6 वर्षाची असताना आम्ही दोघींनी मिळून घरी गणपती आणायचा निर्णय केला त्यात ही माझा. जोतिबा खंबीर पणे सोबत उभा राहिला.व गेली 5 वर्षे आम्ही दीड दिवसाचा गणपती आमच्या घरी बसवत आहोत आणि गणपती उत्सव म्हणजे आमच्या दोन कुटुंबीयांचा कौटुंबिक सोहळा झाला.महत्वाचा म्हणजे नैवेद्या मध्ये शिरखुरमा(खीर)आणि उखळी चे मोदक तसेच शाडू च्या मातीची मूर्ती आणि पर्यावरण पूरक असा देखावा ही आमच्या गणपती ची ओळख बनली.तसेच याचे कौतुक अनेक टीव्ही आणि प्रिंट माध्यमांनी ही केले.याच पद्धतीने आम्ही गेल्या 17 वर्षांपासून ईद, नाताळ,दिवाळी ,होळी, सर्व आनंदाने साजरे करतो.

1897 मध्ये प्लेग च्या साठी च्या वेळी फुले दाम्पत्यांनी स्वतःची पर्वा न करता समाजा साठी उल्लेखनीय कार्य केले.त्यांचा आदर्श समोर ठेवून आम्ही ही कोरोना संकटाच्या वेळी काम केले. मार्च 2020 मध्ये अचानक लॉक डाउन जाहीर झाल्याने सर्व सामान्य प्रमाणे आम्ही ही भयभीत झालो होतो त्यात आम्हाला वाटत होते की आपण गप्प बसून कस राहायचं मात्र निसारला माझ्या प्रकृतीची चिंता सतावत होती.कारण मला मधूमेह आणि जास्त रक्तदाब(blood pressure)चा त्रास असल्याने व घरात 11 वर्षाची चिमुकली असल्याने तिच्या काळजी मुळे

तो घाबरत होता.त्यात सुरुवातीला कोरोना या महामारी बाबत माध्यमातून अनेक भीती दाखवणारे संदेश व बातम्या यायच्या मात्र अशा परिस्थितीत गप्प ही बसवेना. मग आम्ही ठरवले की काळजी घेऊन व खबरदारी घेत अखेर कोरोनाला मात करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि जमेल तसे मदत करीत सुटलो. औषध फवारणी,रेशन वाटप,मास्क वाटप, तसेच घरोघरी जाऊन लोकांना कोरोना पासून बचावा चे उपाय व माहिती देण्याचे काम सुरू केले. त्यात मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले की मुंबईसह महाराष्ट्रात रक्त साठा संपत आहे.तातडीने रक्त संकलनासाठी रक्तदानाची गरज आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही अवघ्या 4 महिन्यात दोन वेळी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 104 बाटल्या रक्त संकलन केले. एकी कडे लोक एक दुसऱ्यावर संशय करत असताना 104 रक्तदाते आम्ही बाहेर काढू शकलो याचे समाधान वाटते. तसेच आम्ही ज्या भागात राहतो व काम केले तिथं कोरोना चा 1 ही रुग्ण आढळला नाही याचा अभिमान वाटतो.तसेच परिसरातील नागरिक, मित्र मैत्रिणी, नातेवाईक तसेच सेवादल सैनिकांनी वेळोवेळी काळजी व्यक्त करत कार्याची प्रशंसा करत प्रोत्साहन ही दिल्याने आम्ही तिघे व आमच्या सोबत अनेक सहकाऱ्यांना कोरोनाने स्पर्श ही करण्याची हिंमत दाखवली नाही. आणि हे फक्त आणि फक्त माई सावित्री व ज्योतिबाचा आदर्श समोर असल्याने शक्य झाले.

येत्या ३ तारखेला मी सावित्री सोबत फातिमा चा उत्सव साजरा करणार आहे.आकाश कंदील,रांगोळी आणि उंबऱ्यावर एक पणती लावणार आहे.

- वैशाली महाडिक

Updated : 30 Dec 2020 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top