Home > रिलेशनशिप > घरातले पैसे घेऊन बायको माहेरात पळाली, नवरा पोलीसांत धाव

घरातले पैसे घेऊन बायको माहेरात पळाली, नवरा पोलीसांत धाव

घरातले पैसे घेऊन बायको माहेरात पळाली, नवरा पोलीसांत धाव
X

तुमची सुध्दा घरी बायको सोबत रोज भांडणं होतात का? होत असतील जरा सावधान... कारण सांगतीलील एका महिलेने रोजच्या कौटूंबीक वादाला कंटाळून चिडलेल्या पत्नीने घरातील तीस हजार रुपये घेऊन माहेर गाठलं आहे. मिरज तालुक्यातील समडोळी येथे राहणाऱ्या भीमराव कांबळे यांचा इचलकरंजी येथील साक्षी यांचाशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. किरकोळ कारणांवरूनही दोघांमध्ये वारंवार खटके उडत उडायचे. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२० ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान साक्षी यांनी घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून भीमराव यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ३० हजार रुपये घेऊन माहेरी पोबारा केला. घरातील पैसे घेऊन पत्नी माहेरी गेल्याचे लक्षात येताच भीमराव यांनी तिची समजूत घालून पुन्हा माघारी बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून पत्नीने पैसे दिले नाहीत आणि ती परतही आली नाही.

अखेर भीमराव यांनी याबाबत पोलीसांत तक्रार दाखलं केली असून, सांगली ग्रामीण पोलिसांनी साक्षी कांबळे हीचावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 22 July 2020 2:23 AM GMT
Next Story
Share it
Top