Home > Political > आता आंध्र प्रदेशच्या राजकारणात सुद्धा दिसणार बहीण-भाऊ वाद; वायएस शर्मिला यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश.

आता आंध्र प्रदेशच्या राजकारणात सुद्धा दिसणार बहीण-भाऊ वाद; वायएस शर्मिला यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश.

आता आंध्र प्रदेशच्या राजकारणात सुद्धा दिसणार बहीण-भाऊ वाद; वायएस  शर्मिला यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश.
X

आता आंध्र प्रदेशच्या राजकारणात सुद्धा दिसणार बहीण-भाऊ वाद; वायएस शर्मिला यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सुप्रिया सुळे-अजित पवार, धनंजय मुंडे-पंकजा मुंडे हा बहीण-भावांचा वाद सर्वांना परिचयाचा आहे. असाच वाद आंध्र प्रदेशच्या राजकारणात सुद्धा आता दिसून येणार आहे. त्याला कारण म्हणजे आंध्र प्रदेशच्या नेत्या वायएस शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आज दुपारी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये आंध्र प्रदेश मध्ये झालेली मोठी पोकळी वायएस शर्मिला भरून काढतात का हे आता पाहावं लागणार आहे.खरंतर तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभे निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता.तेव्हापासूनच त्याच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा होती आणि आज अखेर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.





कोण आहेत वायएस शर्मिला

शर्मिला या काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आहेत तसेच आता सध्याचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या त्या बहीण आहेत.बहिण भावामध्ये झालेल्या वादानंतर त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करून वेगळी चूल मांडली. इतकंच काय जगमोहन रेड्डी आणि वायएस शर्मिला रेड्डी यांच्या मातोश्री यांनी सुद्धा आपल्या मुलाची साथ सोडून मुलीला साथ दिली.





राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत: वायएस शर्मिला

राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत हे माझ्या वडिलांचे स्वप्न होतं आणि माझ्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी झटणार आहे असं मत त्यांनी पक्षप्रवेश घेतेवेळी व्यक्त केलं.

दक्षिणेत मिळणार मोठी जबाबदारी

या पक्षप्रवेशानंतर शर्मिला यांना दक्षिणेमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आता शर्मिला या आपल्या वडिलांप्रमाणेच दक्षिणेमध्ये विशेषकरून आंध्रप्रदेश मध्ये काँग्रेसला उभारी देतात का हे पाहावं लागणार आहे.

Updated : 4 Jan 2024 1:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top