Top
Home > Political > "गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल"

"गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल"

"गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल, शिवाय मेकअप चा वेळ अन् खर्च ही वाचेल" सुषमा अंधारेंची अमृता फडणवीसांवर टीका

गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल
X

सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या टीकेला उत्तर देताना "ए भाई, तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय!" असा इशारा दिला. अमृता फडणवीस यांच हे ट्वीट त्यांनी वापरलेल्या भाषेमुळे चांगलच चर्चेत आलं.

अमृता फडणवीस यांचं ट्वीट रिट्वीट करत सामाजीक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. यात सुश्मा अंधारे यांनी "वाह अमृता फडणवीस वाह.. काय हा माज.. काय ही दंडेलीची भाषा... गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल...! शिवाय मेकअप चा वेळ अन् खर्च ही वाचेल..!!! शुभेच्छा.." असं म्हटलं आहे.

दरम्यान, परमबीर सिंग प्रकरणावरुन सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याबद्दलच एका वृत्त वाहिनीशी बोलताना भाई जगताप यांनी असे म्हटले होते की, "राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे म्हटले होते.

भाई जगताप यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी "ए भाई, तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय!" असा रिप्लाय दिला.


Updated : 2021-03-23T20:18:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top