Home > Political > यशोमती ठाकूर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

यशोमती ठाकूर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

यशोमती ठाकूर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
X

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवारी यवतमाळ मध्ये शिवसेनेची संवाद यात्रा झाली. त्यानंतर ते आज अकोला आणि अमरावतीत शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्या दरम्यान राज्याच्या माजी मंत्री काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले व पाहुण्यांचे स्वागत करण्याची अमरावतीची संस्कृती आहे. काल जो प्रकार घडला अमरावतीमध्ये राणांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले ही आमची संस्कृती नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटल आहे..



Updated : 10 July 2023 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top